(पिंपरी, दि. ८): “श्रीमद् भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळते,” असे प्रतिपादन कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांनी केले. चिन्मय मिशन, पिंपरी-चिंचवडतर्फे निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर सभागृहात आयोजित श्रीमद् भगवद्गीता बारावा अध्याय (भक्तियोग) पठण-वाचन उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत (Chinamay Mission Pcmc)होते.
यावेळी ब्रह्मचारिणी मैत्रेयी चैतन्य, चिन्मय मिशन पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष हेमंत गवंडे आणि सचिव आनंद देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला सुमारे दीड हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि परीक्षक उपस्थित होते. “भगवद्गीता केवळ पूजनीय ग्रंथ न राहता आचरणप्रणाली झाली पाहिजे,” असे आवाहन मैत्रेयी चैतन्य यांनी (Chinamay Mission Pcmc)केले.
या उपक्रमात पिंपरी-चिंचवड परिसरातील ७० हून अधिक शाळांमधील चार हजारांहून अधिक विद्यार्थी तसेच १५० हून अधिक पालक व शिक्षक सहभागी झाले. अंतिम फेरीतील सुमारे एक हजार स्पर्धकांमधून विविध गटांतील विजेत्यांची निवड करण्यात (Chinamay Mission Pcmc)आली.
अ गट : शिवज्ञा पाटील (ज्ञान प्रबोधिनी), सान्वी खिस्ती (साईनाथ बालक मंदिर), कादंबरी भूमकर (गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल), निमिष मोरे (अमृता विद्यालय), जीविका पानवलकर व सुश्रुत म्हसकर (सिटी प्राईड स्कूल).
ब गट : अन्वित रानडे (ज्ञान प्रबोधिनी), आनंदी चौधरी (सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल), नितेश पवार (गायत्री इंटरनॅशनल स्कूल), हर्ष कुलकर्णी (सिटी प्राईड स्कूल), अहिल्या भालेराव (खुला गट), दर्श पगारे (अमृता विद्यालय), आदिराज तरडे (मनोरम प्राथमिक शाळा).
क गट : श्रीवेद केसकर (ज्ञान प्रबोधिनी), शिवांश व्हडदी (एस. बी. पाटील पब्लिक स्कूल), शिवन्या संत (नारायण हट इंग्लिश मीडियम स्कूल), अद्वैत देवकर (पोदार इंटरनॅशनल स्कूल), नीहिरा अमृतकर (सिटी प्राईड स्कूल).
ड गट : सुमेध पाटील (संत तुकाराममहाराज स्कूल), अवनीश चांगण (प्रियदर्शनी स्कूल), धीरज पाटील (एस. पी. एम. मराठी माध्यम शाळा), द्युती आफळे (ज्ञान प्रबोधिनी).
ई गट : वरेण्या पराशरम् (द स्टेपिंग स्टोन स्कूल), रेया सिंग (खुला गट), अनुष्का लोहार (व्ही. के. माटे हायस्कूल), स्वरा शिंदे (गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल).
फ गट : आर्या भिडे (एस. पी. एम. इंग्लिश मीडियम स्कूल).
पालक-शिक्षक गटातील वाचन प्रकारात हर्षदा बरोटे, कांचन व्हडदी, अनघा लेले, पूनम रायते, तर पठण प्रकारात प्रज्ञा रानडे, प्रज्ञा चिटणीस आणि वंदना निकम यांनी प्रथम क्रमांक (Chinamay Mission Pcmc)मिळविला.
विजेत्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली. उल्लेखनीय सहभागाबद्दल सिटी प्राईड स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ज्ञान प्रबोधिनीचे डॉ. मनोज देवळेकर आणि शिक्षकवृंदाचा विशेष सन्मान करण्यात आला. दीपाली फडके यांनी सूत्रसंचालन(Chinamay Mission Pcmc) केले.


