(पिंपरी, दि. १५): चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी मोहीम राबवा. करवसुलीत दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी (Property Tax Recovery)दिला.
पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात करसंकलन व कर आकारणी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार झालेल्या या बैठकीत मालमत्ता कराची थकबाकी, जप्तीची कारवाई, मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे, सारथी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी आणि मागील बैठकीतील सूचनांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात(Property Tax Recovery) आला.
महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात मालमत्ता कराच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असून, त्यातून विविध विकासकामे आणि नागरी सुविधांसाठी आर्थिक नियोजन केले जाते. त्यामुळे निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. सहाय्यक मंडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करून प्रभावी करवसुलीचे नियोजन करावे. करवसुली वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची लेखी माहितीही सादर करावी, असे सांडभोर यांनी स्पष्ट(Property Tax Recovery) केले.
मागील पाच वर्षांतील मालमत्ता कर संकलनाच्या आकडेवारीची तुलना करून चालू वर्षातील वसुलीचा आढावा घेण्यात येणार आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा करवसुलीत अपेक्षित वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी (Property Tax Recovery)दिले.
थकीत कराची वसुली लवकर होऊ शकणाऱ्या मालमत्तांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे. थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊन आवश्यक नोटिसा बजावाव्यात. नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध नियमानुसार जप्तीची कारवाई करावी, असेही त्यांनी (Property Tax Recovery)सांगितले.
महानगरपालिकेच्या नवीन मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत कर आकारणीच्या प्रक्रियेत असलेल्या मालमत्तांबाबतची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. निवासी, बिगरनिवासी, मिश्र वापराच्या, औद्योगिक मालमत्ता तसेच मोकळ्या जमिनींची माहिती अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात आला. मालमत्ता करासंबंधीच्या प्रलंबित तक्रारी, मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे आणि अन्य कामांचा वेळेत निपटारा करावा, असेही सांडभोर यांनी (Property Tax Recovery)सांगितले.
करवसुलीच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी नियमित आढावा घेण्यात येणार असून, यापुढे दर पंधरा दिवसांनी करवसुलीच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार (Property Tax Recovery)आहे.
या बैठकीस करसंकलन व कर आकारणी विभागाचे उपायुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी रश्मी देशपांडे, सहाय्यक मंडल अधिकारी बाळू लोंढे, हनुमंत सरवदे, मनोज शिंदे, अजित नखाते, रणजीत भोसले, जयंत मरळीकर, राजेश बांदल, रविंद्र शिंदे, राजेंद्र कुदळे, प्रसाद एच. एस., राकेश सौदे, अतुल काळे, नाना सोनटके, खुकाळे एस., निता राणे, डी. डी. गोरडे, हनुमंत मोरे, मिलिंद कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित (Property Tax Recovery)होते.


