साठवणीतली गाणी – पुष्प १८:ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…
रसिकजन हो, आदाब! 🙏कसे आहात? मस्तच (Ye Aankhen dekhkar)ना!
बघता बघता दिवाळी तोंडावर आलीसुद्धा. सणासुदीचे दिवस आले की मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी आणि सगळीकडे पसरलेला आनंद… ही दिवाळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाची बरसात घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी (Ye Aankhen dekhkar)प्रार्थना!
आणखी एक आनंदाची गोष्ट मनात घर करून आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा, प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आपल्या पोर्टलला एक वर्ष पूर्ण होत आहे. खरं सांगायचं तर हे सगळं स्वप्नवत वाटतंय. एखादं स्वप्न पाहावं आणि ते आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्षात उतरावं, यापेक्षा मोठा आनंद (Ye Aankhen dekhkar)कोणता?
यासाठी धन्यवाद हा शब्द उच्चारणे म्हणजे केवळ औपचारिकता ठरेल. कारण तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची किंमत कोणत्याही शब्दांत मांडता येणार नाही. म्हणून आज केवळ मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी यापुढेही माझे उर्वरित आयुष्य पत्रकारितेसाठीच व्यतीत करण्याचा माझा संकल्प आहे. तुमचे प्रेम असेच राहू द्या. कारण तुमची साथ हीच माझी खरी ताकद (Ye Aankhen dekhkar)आहे.असो!
आजच्या या आनंदी वातावरणात आपल्या ‘साठवणीतली गाणी’ या सदराचे अठरावे पुष्प गुंफताना पुन्हा एकदा जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या त्या सुंदर दुनियेत फेरफटका मारायचा (Ye Aankhen dekhkar)आहे.
आजचे गाणे आहे…
‘ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…’
१९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धनवान’ या चित्रपटातील हे अप्रतिम प्रेमगीत. चित्रपटात राजेश खन्ना, राकेश रोशन आणि रीना रॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आपले लाडके काका म्हणजेच राजेश खन्ना आणि आजच्या काळातील सुपरस्टार हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांची या चित्रपटातली उपस्थिती लक्षात राहतेच. मात्र, आजचा आपला विषय राजेश खन्ना नाहीत. हे गाणे पडद्यावर खुलते ते राकेश रोशन आणि रीना रॉय यांच्या (Ye Aankhen dekhkar)जोडीवर.
रीना रॉय!
या अभिनेत्रीचा उल्लेख करताना तिच्या सौंदर्याची चर्चा केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तिच्या चेहऱ्यात एक वेगळेच आकर्षण होते. विशेषतः तिचे डोळे! चेहऱ्यावरचे भाव, नजरेतली लाज, ओठांवरचे मंद स्मित आणि अभिनयातील सहजता यामुळे ती पडद्यावर दिसली की नजर तिच्यावर खिळून राहायची. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे अनेक चाहते होते. महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांनीही तिच्या सौंदर्याचे कौतुक केले होते, असे सांगितले(Ye Aankhen dekhkar) जाते.
आणि म्हणूनच आजच्या गाण्याचा मुखडा ऐकताना सर्वप्रथम आठवते ती रीना रॉयची नजर!
‘ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…’
किती साध्या शब्दांत किती मोठी भावना व्यक्त केली आहे साहिर लुधियानवी यांनी! एखाद्याच्या डोळ्यांत इतके गुंतून जावे की आजूबाजूचे जगच विसरून जावे, ही प्रेमाची अवस्था किती सुंदर आहे ना? प्रेमात पडलेल्या माणसाला बाकीच्या जगाचे भान उरत नाही, असे म्हणतात. पण ते नेमके कसे असते, हे या गाण्याच्या पहिल्याच ओळीतून (Ye Aankhen dekhkar)समजते.
डोळे खरोखरच खूप सुंदर असतात. कारण माणूस जे मनाने बोलू शकत नाही, ते त्याचे डोळे सहज बोलून जातात. कधी आनंद, कधी दुःख, कधी राग, कधी प्रेम, तर कधी एखाद्याला भेटण्याची अनावर ओढ… या सगळ्या भावना डोळ्यांतून व्यक्त होत(Ye Aankhen dekhkar) असतात.
काही नजरा बोलक्या असतात, काही अबोल; पण त्या अबोल नजरेतही एक अख्खे जग दडलेले असते. प्रेमात तर डोळ्यांची भाषा समजली की शब्दांची गरजच उरत(Ye Aankhen dekhkar) नाही.
या गाण्यात साहिर यांनी नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करताना तिच्या केसांपासून, डोळ्यांपासून, बाहूंपासून ते ओठांपर्यंत प्रत्येक गोष्टीला प्रेमाच्या नजरेतून पाहिले आहे. तिच्या सुगंधी केसांच्या जाळ्यात अडकून वाटसरू आपला रस्ता विसरतात, ही कल्पना किती काव्यात्म आहे! तिच्या बाहूंच्या मिठीत सारे आधार विसरून जावे आणि तिच्या ओठांवरचे स्मित पाहून फुलांनाही उमलण्याचे भान राहू नये, अशी शब्दांची नजाकत साहिर यांच्या लेखणीतच (Ye Aankhen dekhkar)सापडते.
खरं तर प्रेमगीत लिहिणे आणि प्रेमाची अनुभूती शब्दांत उतरवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. साहिर यांच्या लेखणीतली खासियत अशी की ते प्रेम व्यक्त करताना कुठेही शब्दांचा अतिरेक करत नाहीत. अगदी साध्या शब्दांत ते मनाचा ठाव (Ye Aankhen dekhkar)घेतात.
गाण्यातील मला विशेष भावणारा भाग म्हणजे प्रिय व्यक्ती समोर आल्यानंतर मनात असंख्य गोष्टी असूनही काहीच बोलता न(Ye Aankhen dekhkar) येणे.
आपल्यालाही कधी असा अनुभव आला आहे का? एखाद्या व्यक्तीला खूप काही सांगायचे असते. मनात कितीतरी प्रश्न असतात, कितीतरी भावना साठलेल्या असतात. भेटण्याआधी मनातल्या मनात आपण कितीतरी संवाद साधलेले असतात. पण ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर आली की सगळे शब्दच हरवून जातात. काय बोलावे, कुठून सुरुवात करावी, हेच समजत (Ye Aankhen dekhkar)नाही.
आणि मग डोळेच बोलू लागतात!
‘मोहब्बत में जुबां चुप हो तो आँखें बात करती हैं…’ ही भावना तर या गाण्याचा खरा आत्मा आहे. प्रेमात शब्द थांबले तरी संवाद थांबत नाही. उलट कधी कधी नजरेतून झालेला संवाद शब्दांपेक्षा कितीतरी अधिक प्रभावी (Ye Aankhen dekhkar)असतो.
या गाण्याला लाभलेला आवाजही तितकाच अप्रतिम!
लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर या दोन दिग्गज गायकांनी आपल्या सुरांनी या गीताला एक वेगळीच उंची दिली आहे. लतादीदींच्या आवाजातील नाजूकपणा आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील मृदुता यांचा सुरेख मिलाफ येथे अनुभवायला मिळतो. दोन्ही आवाजांमधील गोडवा प्रेमाच्या भावनेला अधिक हळुवार (Ye Aankhen dekhkar)बनवतो.
संगीतकारांनीही या शब्दांना साजेसे संगीत दिले आहे. कुठेही अनावश्यक गाजावाजा नाही, आवाजाची उंची दाखवण्याचा अट्टहास नाही. गाणे ऐकताना आपण नकळत त्याच्या सुरांमध्ये हरवून जातो. म्हणूनच हे गाणे केवळ ऐकायचे नाही, तर अनुभवायचे (Ye Aankhen dekhkar)आहे.
मित्रांनो, जुन्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य मला नेहमीच भावते. ती गाणी केवळ मनोरंजन करत नाहीत, तर आपल्या आयुष्यातील एखादा क्षण, एखादी आठवण, एखादी व्यक्ती पुन्हा जिवंत करतात. एखादे गाणे ऐकले की आपण भूतकाळात जातो. कधी कॉलेजचे दिवस आठवतात, कधी पहिली भेट, कधी एखादी न सांगितलेली भावना, तर कधी आयुष्यातून निघून गेलेली एखादी व्यक्ती (Ye Aankhen dekhkar)आठवते.
कदाचित म्हणूनच काही गाणी कधीच जुनी होत नाहीत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, संगीताचे प्रकार बदलतात; पण मनाला भिडणाऱ्या सुरांची जादू मात्र कायम (Ye Aankhen dekhkar)राहते.
‘ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…’ हेही त्यापैकीच एक गाणे.
आजच्या धावपळीच्या जगात आपण एकमेकांशी बोलतो, संदेश पाठवतो, फोन करतो; पण कधी निवांत बसून एखाद्याच्या डोळ्यांत पाहण्याचा क्षण मात्र हरवत चालला आहे. कदाचित या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या हरवलेल्या हळुवारपणाची आठवण(Ye Aankhen dekhkar) होते.
आणि हो, दिवाळीच्या या दिवसांत आपल्या आयुष्यातही अशी काही माणसे असतात, ज्यांच्या एका हसण्याने घर उजळून निघते, ज्यांच्या एका नजरेने मन प्रसन्न होते. त्यांच्यासाठी वेळ काढा. त्यांच्याशी बोला. कारण आयुष्याच्या शेवटी आठवणीत राहतात त्या अशाच छोट्या छोट्या क्षणांच्या गोड (Ye Aankhen dekhkar)आठवणी!
तर रसिकजन हो, आजच्या अठराव्या पुष्पाची सांगता करताना एवढेच (Ye Aankhen dekhkar)म्हणेन…
काही गाणी कानांवर पडतात आणि विसरली जातात; काही गाणी मात्र मनात घर करतात. ‘ये आँखें देखकर…’ हे त्यापैकीच एक. पुन्हा पुन्हा ऐकावे, पुन्हा पुन्हा गुणगुणावे आणि प्रत्येक वेळी नव्याने प्रेमात पडावे, असे हे अवीट गोडीचे(Ye Aankhen dekhkar) गीत!
तुमची दिवाळी आनंदाची, सुखाची आणि समाधानाची जावो. तुमच्या आयुष्यात प्रेमाची, आपुलकीची आणि सुंदर नात्यांची अशीच बरसात होत (Ye Aankhen dekhkar)राहो.
लवकरच भेटू या ‘साठवणीतली गाणी’च्या पुढच्या पुष्पात. तोपर्यंत जुन्या गाण्यांच्या आठवणींत रममाण व्हा आणि आपल्या माणसांच्या डोळ्यांतले प्रेम वाचायला विसरू(Ye Aankhen dekhkar) नका!
तर मग वाचत रहा साठवणीतली गाणी 😄😄
आपलाच,
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
