(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय उपक्रमात एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले (Prabodhan Parv 2026)आहे.
शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प परिसरात एकता दौड आणि देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वाजता ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान, तर ६ वाजता निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम होणार (Prabodhan Parv 2026)आहे.
रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात रक्तदान शिबिर होईल. दुपारी ३ ते ५ या वेळेत सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित कार्यक्रम, तर सायंकाळी ६ वाजता ‘अखंड भारताचे शिलेदार, तुकडे ते राष्ट्र’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. याशिवाय निबंध, रांगोळी आणि सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या(Prabodhan Parv 2026) आहेत.
सरदार पटेल यांचे राष्ट्रएकात्मता आणि अखंड भारताच्या निर्मितीतील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांनी या दोन दिवसीय प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे क्रीडा विभागाचे उपआयुक्त पंकज पाटील यांनी केले (Prabodhan Parv 2026)आहे.
