पिंपरी-चिंचवड शहरात मारहाण, घरफोडी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, वाहनचोरी, अपघात, तडीपारी आदेशाचा भंग आणि अमली पदार्थांची विक्री अशा विविध घटना उघडकीस आल्या आहेत. शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने शिक्षकाची १६.२४ लाखांची फसवणूक, तर पेट्रोल पंपावर गुगल पेने पैसे दिल्यानंतर एका व्यक्तीच्या खात्यातून ९.९३ लाख रुपये गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय भोसरी, रावेत, निगडी, चिंचवड, पिंपरी आणि वाकड परिसरांत विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली (Pcmc Crime News)आहे.
ऑनलाइन फसवणुकीत शिक्षकाला १६.२४ लाखांचा गंडा
शेअर्स खरेदीच्या नावाखाली ऑनलाइन गुंतवणूक करण्यास सांगून एका ४९ वर्षीय शिक्षकाची १६ लाख २४ हजार ६०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. १३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून शिक्षकाला विविध समूहांत सहभागी करण्यात आले. त्यानंतर ॲप डाउनलोड करण्यास सांगून पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून पैसे पाठवण्यास प्रवृत्त करण्यात आले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू(Pcmc Crime News) आहे.
पेट्रोल भरल्यानंतर मोबाइलमध्ये बिघाड; खात्यातून ९.९३ लाख गायब
रावेत येथील कांताराम कृष्णा काशीद (वय ४७) यांनी संभाजी चौकात दुचाकीत २६५ रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर गुगल पेने पैसे दिले. त्यानंतर त्यांचा मोबाइल गरम होऊन काही काळ बंद पडला. मोबाइल पुन्हा सुरू झाल्यानंतर रात्री ऑनलाइन व्यवहार करताना अडचण आली. घरी जाऊन खात्यातील शिल्लक तपासली असता ९ लाख ९३ हजार ३०५ रुपये कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाइल हॅक करून ओटीपीशिवाय पैसे काढल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रावेत पोलिस तपास करीत (Pcmc Crime News)आहेत.
भोसरीत भावाला मारहाण केल्याच्या रागातून लाकडी स्टुलाने हल्ला
भोसरी एमआयडीसी परिसरातील टेल्को रोडवरील कंपनीत भावाला मारहाण केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून विशाल सुरेश कांबळे (वय ३६) याने वसंत शेलार (वय ५०) यांना लाकडी स्टुलाने मारहाण केली. कपाळावर, पाठीवर आणि हातावर मार लागल्याने शेलार किरकोळ जखमी झाले. २७ ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.
भोसरीत घरफोडी; सोन्या-चांदीचे ४० हजारांचे दागिने चोरीला
भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात घराचा मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून ४.५ ग्रॅम सोन्याचे आणि २५ तोळे चांदीचे दागिने असा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. २७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत (Pcmc Crime News)आहेत.
निगडीत डंपरच्या धडकेत मोपेडस्वार गंभीर जखमी
निगडी प्राधिकरणातील भक्ती-शक्ती चौकाजवळ इन्स्पारिया मॉलसमोर भरधाव डंपरने मोपेडला धडक दिली. या अपघातात रामानंद रामभजन सिंह जखमी झाले. डंपरचालक अनवर वहाब शेख याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी हा अपघात (Pcmc Crime News)झाला.
वाल्हेकरवाडीत सहा लॅपटॉप आणि मोबाइलची चोरी
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील सद्गुरू अपार्टमेंटमधील फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने सहा लॅपटॉप आणि एक मोबाइल चोरून नेला. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते आठदरम्यान घडलेल्या या चोरीत एक लाख ६५ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News)आहे.
निगडीतून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला
भक्ती-शक्ती चौकातील ऐ वन हॉटेलसमोर उभी केलेली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. २७ ऑक्टोबरच्या सकाळपासून २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.
तडीपार आदेशाचा भंग; तलवार बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करून तलवार बाळगल्याप्रकरणी आकाश शंकर लष्करे (वय २९) याला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून, तडीपारी आदेशाचा भंग आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News)आहे.
वाकडमध्ये १८ ग्रॅम एमडीसह दोघांना अटक
वाकडमधील कावेरीनगर भाजी मंडईजवळील मोकळ्या मैदानात विक्रीसाठी एमडी (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जमीर खान चग भिकु खान (वय ३३) आणि राजेश दत्तात्रय मेंगडे (वय ४०) यांना पोलिसांनी अटक केली. २७ ऑक्टोबर रोजी रात्री केलेल्या कारवाईत १८ ग्रॅम एमडी पावडर, तीन मोबाइल आणि दुचाकी असा एकूण दोन लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे
