Home गुन्हे Bhausaheb Bhoir:ओंबासे प्रकरणासह बीट मार्शल गैरव्यवहारांची चौकशी करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी

Bhausaheb Bhoir:ओंबासे प्रकरणासह बीट मार्शल गैरव्यवहारांची चौकशी करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी

मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्या लाच प्रकरणाची आणि बीट मार्शल व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांकडे केली.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबरोबरच बीट मार्शल व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, गैरवर्तणूक आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली (Bhausaheb Bhoir) आहे.

 

यासंदर्भात भोईर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच घेताना अटक केली. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासकीय पारदर्शकतेबरोबरच संस्थेच्या प्रतिमेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले (Bhausaheb Bhoir) आहे.

 

तसेच महापालिकेच्या बीट मार्शल व्यवस्थेबाबत गैरव्यवहार, गैरवर्तणूक आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुख्य अभियंता ओंबासे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद फायली, निविदा आणि कामांची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करावी. बीट मार्शल व्यवस्थेसंदर्भातील सर्व प्रलंबित तक्रारींचीही निष्पक्ष चौकशी करून गैरव्यवहार उघडकीस आणावेत, अशी मागणी त्यांनी (Bhausaheb Bhoir) केली.

 

दोन्ही प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी. महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी तातडीने ठोस पावले उचलावीत. अन्यथा नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भाऊसाहेब भोईर यांनी (Bhausaheb Bhoir) दिला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00