प्रतिनिधी :इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइडच्या अध्यक्षा दिपालीताई जाधव यांनी यापूर्वीही शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कॉलरशिप व नवनीतच्या मार्गदर्शिका उपलब्ध करून दिल्या होत्या. गोवित्री केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांचे सहकार्य शाळेला मिळत(InnerWheelClub NigdiPride ) आहे.
स्वेटर वाटपप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दिपालीताई जाधव आणि सदस्या सुवर्णाताई जांभुळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा (InnerWheelClub NigdiPride )दिल्या.
या वेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपालीताई बिनगुडे, माजी अध्यक्ष दिनेशभाऊ गरुड, माजी विद्यार्थी संघाचे सोमनाथभाऊ बिनगुडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित (InnerWheelClub NigdiPride )होते.
