Home माझं पिंपरी चिंचवड Pratibha College Sports: प्रतिभा महाविद्यालयाच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

Pratibha College Sports: प्रतिभा महाविद्यालयाच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

चिंचवडच्या प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, जलतरण, नेमबाजी आणि जिम्नॅस्टिक्समध्ये घवघवीत यश; अनेक खेळाडूंची विभागीय व आंतरविभागीय स्पर्धांसाठी निवड.

by Admin
Spread the love

(चिंचवड, दि. ८) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित पुणे जिल्हा विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. या कामगिरीबद्दल प्रतिभा महाविद्यालयाचे कौतुक होत (Pratibha College Sports)आहे.

पुणे जिल्हा आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा महाविद्यालयाच्या महिला संघाने विजेतेपद पटकावले. या संघातील एस.वाय.बी.ए.ची अर्पिता आर्डे हिची उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली (Pratibha College Sports)आहे.

वेटलिफ्टिंग स्पर्धेत एफ.वाय.बी.कॉमचा हर्षद चौधरी याने ९५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. वेदांत धोरे याने ६० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला. या दोन्ही खेळाडूंची पुणे जिल्हा संघातून आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली (Pratibha College Sports)आहे.

जलतरण स्पर्धेत एस.वाय.सी.एस.चा प्रथमेष कदम याने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक (Pratibha College Sports)पटकावले.

१० मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत एस.वाय.बी.ए.ची भक्ती नारायणकर हिने प्रथम क्रमांक, तर बी.कॉम. (बी.एम.)ची राजनंदिनी यादव हिने तृतीय क्रमांक मिळविला. या दोन्ही खेळाडूंची पुणे जिल्हा संघातून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली(Pratibha College Sports) आहे.

कलात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये एफ.वाय.बी.कॉम.चा सार्थक विजय नलावडे याची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली (Pratibha College Sports)आहे.

याशिवाय नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत सोहन गोळे, अथर्व शिंदे, केतन मोरे, शिवप्रसाद संगमे आणि स्नेहल गुप्ता यांनी प्रतिभा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व(Pratibha College Sports) केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, क्रीडा संचालक प्रा. संकेत सावेकर आणि प्रा. पांडुरंग इंगळे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा(Pratibha College Sports) दिल्या.

या यशामुळे प्रतिभा महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला बळ मिळाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी आहे, असे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी (Pratibha College Sports)सांगितले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00