Home प्रेरणा / यशकथा Pradhikaran Senior Citizens:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या ‘चैतन्य’ दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन

Pradhikaran Senior Citizens:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या ‘चैतन्य’ दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन

by Admin
Spread the love

(प्राधिकरण, निगडी ): प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या ‘चैतन्य’ दिवाळी अंक २०२६ चा प्रकाशन सोहळा ३० ऑक्टोबर रोजी दादा-दादी उद्यानात उत्साहात पार (Pradhikaran Senior Citizens)पडला.

 

मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. अनुराधा पेंडुलकर यांनी स्वागतगीत सादर केले. संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी आणि अंकाच्या संपादिका आशा नष्टे यांनी मनोगत व्यक्त केले. अंक वेळेत प्रकाशित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल आशा नष्टे यांचा चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दादा-दादी विरंगुळा केंद्राला पोडियम भेट दिल्याबद्दल निनाद चिखलीकर यांच्या वतीने डॉ. गुणवंत चिखलीकर यांनी सन्मान (Pradhikaran Senior Citizens)स्वीकारला.

 

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध साहित्यिक प्रा. जगदीश संसारे यांचा परिचय साधना सपाटे यांनी करून दिला. अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सत्यम ज्वेलर्सचे संचालक किरणराजजी चोप्रा यांचा परिचय विश्वास म्हशेटे यांनी करून दिला. माजी अध्यक्ष दलिचंद शिंगवी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात(Pradhikaran Senior Citizens) आला.

 

प्रा. जगदीश संसारे यांनी अवघ्या चार दिवसांत अंकाचे वाचन करून त्यातील लेख, कथा, कविता आणि प्रवासवर्णनांचे कौतुक केले. अंक दर्जेदार व वाचनीय असल्याचे नमूद करत त्यांनी उपस्थितांना आपल्या व्याख्यानातून मंत्रमुग्ध केले. तसेच संपादक समितीतील सर्व सदस्यांना विश्वभान प्रतिष्ठानतर्फे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे किरणराजजी चोप्रा यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आपल्या दुकानात स्वागत असून त्यांना विशेष सवलत देण्यात येईल, असे जाही(Pradhikaran Senior Citizens)र केले.

 

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. केशव गिंडे यांच्या बासरीवादनाने आणि सुभाष चव्हाण यांच्या शंखवादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. दिवाळी अंकासाठी सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातून आर्थिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात (Pradhikaran Senior Citizens)आला.

 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वृषाली गुर्जर, अस्मिता तारकुंडे, चांदबी सय्यद, सुनील दुर्गे तसेच कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्मिता देशपांडे यांनी केले, तर कार्याध्यक्षा अलका बेल्हेकर यांनी आभार(Pradhikaran Senior Citizens) मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00