Home गुन्हे Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू

डांगे चौकातील सिग्नेचर पार्क सोसायटीत १८ व्या मजल्यावरून पडल्याने आई एकता भांगड आणि सहा वर्षीय मुलगा माधव यांचा मृत्यू. घटनेचा वाकड पोलिसांकडून तपास सुरू.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड ): डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत आई आणि तिच्या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृतांची नावे आहेत. इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, वाकड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू(Signature Park Society) आहे.

 

भांगड कुटुंब मूळचे राजस्थानचे असून, मनोज भांगड हे येरवडा येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी करतात. गेल्या दोन वर्षांपासून हे कुटुंब सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी मनोज हे कामावर गेले असताना घरी पत्नी एकता आणि मुलगा माधव (Signature Park Society)होते.

 

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या अंतर्गत भागात मोठा आवाज झाल्याने रहिवाशांनी खाली धाव घेतली. त्यावेळी एकता आणि माधव गंभीर अवस्थेत आढळले. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू (Signature Park Society)केला.

 

सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रण तपासले असता, एकता या मुलासह लिफ्टने १८ व्या मजल्यावर जाताना दिसून आल्या. तसेच त्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्या चपला आढळल्या आहेत. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले(Signature Park Society) आहेत.

 

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही चित्रण, घटनास्थळावरील पुरावे आणि अन्य बाबींच्या आधारे वाकड पोलीस पुढील तपास करीत (Signature Park Society)आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00