(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): दिवाळीनिमित्त घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी ‘आर.आर.आर. (रिड्यूस, रीयूज, रिसायकल) कलेक्शन ड्राइव्ह’ राबविण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वस्तू संकलन केले जाणार (Reuse Recycle Reduce)आहे.
या मोहिमेत नागरिकांनी वापरण्यायोग्य कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळणी, भांडी, चादरी, पडदे, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा कराव्यात. या वस्तूंचा पुनर्वापर केल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास आणि गरजूंना मदत होण्यास हातभार लागणार (Reuse Recycle Reduce)आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. वस्तूंचा पुनर्वापर केल्याने पर्यावरणावरील ताण कमी होतो, असे त्यांनी नमूद केले. उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही वापरण्यायोग्य वस्तू फेकून न देता संकलन केंद्रांमध्ये जमा करण्याचे आवाहन (Reuse Recycle Reduce)केले.
३१ ऑक्टोबर रोजी वस्तू संकलनाची ठिकाणे
रेनबो व्हिस्टा, आहेरनगर; सिद्धिविनायक विंड चाइम, रहाटणी; द वुड्स, वाकड; अक्षर एलिमेंटा व पॅलॅडिओ अपार्टमेंट, ताथवडे; द्वारका सनक्रेस्ट फेज १ व यश संकुल, पिंपळे सौदागर; ओमेगा पॅराडाइज, होरायझन्स ॲट वाकड व ला मेलोसा, वाकड; भूमी ओराबेल, सेलेस्टियल सोसायटी फेज २, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी, उदय हिलटॉप रेसिडेन्सी, संत ज्ञानेश्वर उद्यान व चंद्रभागा कॉर्नर, रावेत; रेणुका पंचतत्त्व(Reuse Recycle Reduce), ताथवडे.
१ नोव्हेंबर रोजी वस्तू संकलनाची ठिकाणे
वुड्सव्हिल फेज १, २ व ३, लोटस नंदवन फेज १, कुमार प्रिन्सव्हिल फेज १ व सेंट्रल पार्क रेसिडेन्सी, मोशी; रिव्हर रेसिडेन्सी फेज ३, चिखली; ऐश्वर्यम, आकुर्डी; गोखले वृंदावन, चिंचवड; ट्युलिप इन्फिनिटी वर्ल्ड, पुनावळे; मिलेनियम पॅसिफिक व वसंत ॲव्हेन्यू, ताथवडे; निसर्ग किरण, रहाटणी; गंगा स्काइज सोसायटी; वल्लभनगर, पिंपरी आणि कुमार प्रथम,(Reuse Recycle Reduce) मोशी.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी ७०३०९०१९९३ किंवा ९१६८६८४६७० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले(Reuse Recycle Reduce) आहे.



