पिंपरी-चिंचवड : स्पा सेंटर चालकाकडे खंडणी मागणारा तोतया पत्रकार, ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक, घरफोड्या, मारहाण, अपघात आणि अमली पदार्थ बाळगण्याच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या विविध घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले (PCMC Crime News)आहेत.
स्पा सेंटर चालकाकडे खंडणी मागणारा तोतया पत्रकार अटकेत
स्पा सेंटरचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागून बदनामीकारक बातमी प्रसिद्ध करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला काळेवाडी पोलिसांनी जगताप डेअरी चौकातील साई कॉर्नर येथे रंगेहाथ पकडले. साजिद मन्सुर पेंढारी यांच्या तक्रारीनुसार, आरोपीने १० हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात(PCMC Crime News) घेतले.
ज्येष्ठ नागरिकांसह तरुणीची लाखोंची सायबर फसवणूक
ताथवडे येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची महानगर गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने बनावट एपीके फाईल डाऊनलोड करायला लावून २ लाख ७९ हजार ७०२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. किवळे येथील ७२ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाच्या बँक खात्यातून ओटीपीचा गैरवापर करून ६ लाख १० हजार ३०९ रुपये वळवण्यात आले. दोन्ही प्रकरणांत अनुक्रमे वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले (PCMC Crime News)आहेत.
हिंजवडीतील २५ वर्षीय तरुणीला इन्स्टाग्रामवरील गिफ्ट विक्रीच्या पेजवरून ६७ हजार ३७९ रुपयांचा गंडा घालण्यात आला. जीएसटीच्या नावाखाली तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. तसेच, कासारवाडीत ‘प्रॉपर्टी पॉईंट’च्या कथित बिझनेस प्लॅनमध्ये ११ लाख रुपये गुंतवल्यास १ कोटी ११ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला(PCMC Crime News) आहे.
बारमध्ये चोरी; पिंपळे निलखमध्ये साडेचार लाखांचे दागिने लंपास
चिखलीतील साने चौकाजवळील ‘कन्हा ५१ बार अँड रेस्टॉरंट’चे शटर तोडून चोरट्याने विदेशी दारू, सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि रोख रकमेसह २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. पिंपळे निलख येथील मोरया अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप सेफ्टी डोअरला अडकवलेल्या चावीने उघडून ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले. या दोन्ही घटनांचा संबंधित पोलीस तपास करत(PCMC Crime News) आहेत.
वायसीएम रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली टीव्हीएस कंपनीची रिक्षाही चोरीला गेली असून, याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली (PCMC Crime News)आहे.
किरकोळ वादांतून मारहाण; तिघे जखमी
आळंदी येथे ८०० रुपयांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादात टॅक्सी चालकाच्या डोक्यावर आणि पायावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. मोशीतील ग्लोबल सोसायटीसमोर स्टूल वापरण्याच्या कारणावरून दोन पाणीपुरी विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत एका विक्रेत्याच्या हाताला दुखापत झाली असून, आरोपीला अटक करण्यात आली (PCMC Crime News)आहे.
चिंचवडमध्ये दीड महिन्यापूर्वी केलेल्या कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून मजुराच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून त्याला जखमी करण्यात आले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला(PCMC Crime News) आहे.
भोसरीत दुचाकीस्वाराचा मृत्यू; देहूरोडमध्ये पादचारी ठार
पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी उड्डाणपुलाजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार रामेश्वर शिंगोरे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली(PCMC Crime News) आहे.
देहूरोड येथील विकासनगर सर्व्हिस रोडवर अज्ञात दुचाकीच्या धडकेत संजय नामदेव सुरवसे हे ५८ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पळून गेला असून, देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत (PCMC Crime News)आहेत.
चऱ्होलीत मद्यधुंद चालकाने चार वाहनांना धडक दिली
चऱ्होली बुद्रुक येथे मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या चालकाने ॲक्टिव्हा, रिक्षा, युनिकॉर्न दुचाकी आणि टोयोटा इनोव्हा या वाहनांना धडक दिली. या अपघातात ॲक्टिव्हावरील चालक आणि त्यांची मुलगी जखमी झाले असून, वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दिघी पोलीस तपास करत (PCMC Crime News)आहेत.
पिस्तूल-काडतुसे जप्त; गांजा सेवनप्रकरणी तिघांना अटक
आंबेठाण-महाळुंगे रस्त्यावरील हॉटेल रायबा परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या राहुल राजू धनगर याला उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४१ हजार ५०० रुपये किमतीचे पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात(PCMC Crime News) आली.
निघोजे येथील पूजा हॉटेलजवळ गांजाचे सेवन आणि बाळगल्याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी राकेश राम राय, रमेश देविदास राठोड आणि रवी रामकिशोर सोनकर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून गांजा, चिलम आणि माचिस जप्त करण्यात आली (PCMC Crime News)आहे.
