Home महाराष्ट्र Sharadiya Navratri 2026: शारदीय नवरात्रोत्सव सुरू; घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि नऊ दिवसांचे वेळापत्रक

Sharadiya Navratri 2026: शारदीय नवरात्रोत्सव सुरू; घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि नऊ दिवसांचे वेळापत्रक

शारदीय नवरात्रोत्सव २०२६ ला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, देवीच्या नऊ रूपांच्या पूजेचे वेळापत्रक आणि २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीने उत्सवाची सांगता.

by Admin
Spread the love

शारदीय नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, घरोघरी आणि मंदिरांमध्ये घटस्थापना करून देवी दुर्गेच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाणार आहे. यंदा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा असून, २० ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने उत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हस्त नक्षत्र, शुक्ल योग आणि गजकेसरी योगाचा संयोग असल्याचे ज्योतिषीय गणनेत सांगितले जात (Sharadiya Navratri 2026)आहे.

 

हत्तीवर देवीचे आगमन; समृद्धीचे प्रतीक

 

नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवारी होत असल्याने धार्मिक मान्यतेनुसार यंदा देवीचे वाहन हत्ती मानले जात आहे. हत्तीवरून देवीचे आगमन होणे हे चांगला पाऊस, शेतीतील समृद्धी आणि सुख-समृद्धीचे संकेत मानले जातात. शनि ग्रहाचे मीन राशीतील स्थानही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. या ज्योतिषीय बाबी धार्मिक मान्यतांवर आधारित (Sharadiya Navratri 2026)आहेत.

 

घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त

 

ज्योतिषाचार्य उमेश एस. स्वामी यांच्या माहितीनुसार, प्रतिपदेला चित्रा नक्षत्र रात्री १० वाजून ३२ मिनिटांपर्यंत, तर वैधृति योग रात्री ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहणार (Sharadiya Navratri 2026)आहे.

 

घटस्थापनेसाठीचे प्रमुख मुहूर्त पुढीलप्रमाणे :

 

– अभिजित मुहूर्त : सकाळी ११.४९ ते दुपारी १२.३७

– लाभ-अमृत चौघडिया : सकाळी १०.०४ ते दुपारी १२.१५

– धनु लग्न : सकाळी ११.३२ ते दुपारी १.३६

 

नवरात्रोत्सवातील देवीपूजनाचे वेळापत्रक

 

– ११ ऑक्टोबर : माँ शैलपुत्री आणि घटस्थापना

– १२ ऑक्टोबर : माँ ब्रह्मचारिणी

– १३ ऑक्टोबर : माँ चंद्रघंटा

– १४ ऑक्टोबर : माँ कूष्मांडा

– १५ ऑक्टोबर : माँ स्कंदमाता

– १६ ऑक्टोबर : माँ कात्यायनी

– १७ ऑक्टोबर : माँ कालरात्री

– १८ ऑक्टोबर : माँ महागौरी

– १९ ऑक्टोबर : माँ सिद्धिदात्री

– २० ऑक्टोबर : दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी

 

नऊ दिवसांच्या या उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा, उपवास आणि विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तिभावाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार (Sharadiya Navratri 2026)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00