Home माझं पिंपरी चिंचवड Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे

चिंचवडमध्ये ‘साहित्य स्वानंद’ दिवाळी अंक २०२६ चे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते प्रकाशन. सामाजिक सलोखा आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश; दीपावलीनिमित्त कविसंमेलनही उत्साहात

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २ ): सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान असून लेखक आणि कवींनी आपल्या साहित्य अभिव्यक्तीतून या विचाराला बळकटी द्यावी, असे आवाहन साहित्यिक व ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे (Sahitya Swanand Diwali Ank) केले.

 

समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि तीर्थ पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् परिसरातील शाहीर योगेश रंगमंचावर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) ‘साहित्य स्वानंद’ दिवाळी अंक २०२६ चा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभुणे बोलत (Sahitya Swanand Diwali Ank)होते.

 

कार्यक्रमाला क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्ष मानसी चिटणीस आणि दिवाळी अंकाचे संपादक महादेव कोरे यांची प्रमुख उपस्थिती(Sahitya Swanand Diwali Ank) होती.

 

प्रभुणे म्हणाले, अर्थवाही मुखपृष्ठ आणि वैविध्यपूर्ण साहित्य आविष्कारामुळे ‘साहित्य स्वानंद’ हा दिवाळी अंक दर्जेदार आणि संग्राह्य झाला आहे. ॲड. सतीश गोरडे यांनी साहित्यनिर्मितीचा हेतू केवळ मनोरंजन नसून समाजप्रबोधन हे साहित्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. संपादक महादेव कोरे यांनी ‘साहित्य स्वानंद’ दिवाळी अंकाच्या तेरा वर्षांच्या वाटचालीचा आढावा(Sahitya Swanand Diwali Ank) घेतला.

 

प्रकाशन सोहळ्यानंतर दीपावलीनिमित्त कविसंमेलन आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ कवी सुरेश कंक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात सुमारे २५ कवींनी विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांची दाद (Sahitya Swanand Diwali Ank)मिळवली.

 

यामध्ये शोभा जोशी, चंद्रकांत धस, राधाबाई वाघमारे, सुहास घुमरे, फुलवती जगताप, नितीन यादव, सीमा गांधी, वैभव धस, शामराव सरकाळे, जयश्री श्रीखंडे, अशोक सोनवणे, सीमा बोबडे, सुभाष चव्हाण, नीलिमा जोशी, राजेश चौधरी, शरयू कुलकर्णी, रेवती साळुंखे, नरेंद्र चव्हाण, श्रद्धा चटप, चंद्रकांत, स्नेहा पाठक, दिलीप अहिरे आणि रेखा दुसाने यांनी सहभाग(Sahitya Swanand Diwali Ank) घेतला.

 

अध्यक्षीय मनोगतात सुरेश कंक यांनी, दिवाळीचा फराळ जसा षड्रसयुक्त असतो, त्याचप्रमाणे कवींनी आपल्या कवितांमधून नवरसांचा परिपोष करावा, असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘आरोग्य’ या कवितेचे दमदार सादरीकरण (Sahitya Swanand Diwali Ank)केले.

 

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे सदस्य आणि कोरे परिवार यांनी परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मानसी चिटणीस यांनी आभार (Sahitya Swanand Diwali Ank)मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00