दिवाळीनिमित्त गड-किल्ल्यांचा जागर; सहा क्रमांकांसाठी रोख बक्षिसे, सोसायट्या आणि तरुण मंडळांना सहभागाचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सेवा सारथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत शहरातील शिवप्रेमी, गृहनिर्माण सोसायट्या आणि तरुण मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेची माहिती सेवा सारथी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ओंकार गंगाधर मांडगे यांनी (Fort Building Competition 2026)दिली.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक ५१ हजार रुपये, द्वितीय ३५ हजार, तृतीय २१ हजार, चतुर्थ ११ हजार, पाचवा १० हजार आणि सहावा क्रमांक सात हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर सहभागी प्रत्येक संघाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार(Fort Building Competition 2026) आहे.
प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी किंवा विंगमधून एक किल्ला साकारता येणार असून, एका संघात जास्तीत जास्त पाच सदस्य असतील. किल्ल्याची ऐतिहासिक अचूकता, नैसर्गिक साहित्याचा वापर, कलात्मक मांडणी आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश या निकषांवर परीक्षण केले जाणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी विनामूल्य(Fort Building Competition 2026) आहे.
किल्ल्यांचे परीक्षण २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून तज्ज्ञ परीक्षकांकडून संबंधित सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष केले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारितोषिक वितरण समारंभ होणार (Fort Building Competition 2026)आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तकांपुरता मर्यादित न राहता प्रत्येक घरात आणि नव्या पिढीच्या मनात रुजावा, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी (Fort Building Competition 2026)सांगितले.
स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी सेवा सारथी – ७३५००४६६२५, कार्तिक चव्हाण – ७२७६३५८७०३, आदर्श बोर्सुने – ७२४९६८४८१८, ओंकार मांडगे – ८४२१८४६६२५ आणि स्वरूप कबाडे – ८३९००८७३१२ या क्रमांकांवर संपर्क(Fort Building Competition 2026) साधावा.
