(पिंपरी-चिंचवड) : मोशी कचरा डेपूमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनासह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले. मोशीतील ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन विविध समस्यांचे निवेदन सादर (Moshi Garbage Depot)केले.
कचरा डेपोवरील वाढत्या भारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. डेपोची सद्यस्थिती, क्षमता, पर्यावरणावरील परिणाम आणि कार्यपद्धतीची तांत्रिक तपासणी करून अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी(Moshi Garbage Depot) केली.
शहरातील सर्व कचरा एकाच ठिकाणी आणण्याऐवजी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र, आधुनिक आणि शास्त्रोक्त कचरा प्रक्रिया केंद्र उभारावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच ओला आणि सुका कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण बंधनकारक करून मोशी डेपोवरील भार कमी करण्याची मागणी करण्यात(Moshi Garbage Depot) आली.
कचऱ्यातून निर्माण होणारे दूषित द्रव (लिचेट) इंद्रायणी नदीत मिसळत असल्याच्या तक्रारीची तातडीने पाहणी करावी, संभाव्य प्रदूषण रोखून नदीच्या पाण्याचे नमुने तपासावेत आणि अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. याशिवाय डेपो परिसरातील हवा, पाणी आणि मातीची गुणवत्ता तपासणे, नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आणि डेपोच्या भविष्यातील वापरासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात (Moshi Garbage Depot)आली.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार लांडगे यांनी नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि इंद्रायणी नदीचे संवर्धन यांना प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही(Moshi Garbage Depot) दिली.
यावेळी नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, अर्चना सस्ते, डॉ. सुहास कांबळे, माजी नगरसेविका कविता आल्हाट, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सारिका बोऱ्हाडे, सुजाता बोराटे, सारिका गायकवाड, संजीवन सांगळे, अतिश बारणे, ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, निलेश बोराटे, प्रकाश आल्हाट, निखिल सस्ते, नितीन बोऱ्हाडे, राजेश सस्ते यांच्यासह ग्रामस्थ व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित(Moshi Garbage Depot) होते.
