(पिंपरी, दि. ७ ): हास्याचे क्षण, मैत्रीची ताकद, बदलती नाती आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या ‘ऑल दि बेस्ट’ आणि ‘वरवरचे वधू-वर’ या दोन नाटकांनी मंगळवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगत आणली. ‘ऑल दि बेस्ट’ने प्रेक्षकांना मनमुराद हसविले, तर ‘वरवरचे वधू-वर’ने आजच्या पिढीचा प्रेम आणि विवाहाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन विनोदी पद्धतीने मांडला. दोन्ही प्रयोगांना नाट्यरसिकांची तुडुंब गर्दी झाली(Marathi Bhasha Week) होती.
मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा परिचय नागरिकांना व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले (Marathi Bhasha Week)आहे.
सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी दुपारच्या सत्रात देवेंद्र पेम लिखित ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग झाला. मयुरेश पेम, मनमित पेम आणि निखिल चव्हाण यांच्या अभिनयाने नाटकाला चांगली रंगत आली. विनोदी प्रसंग आणि मिश्कील संवादांमुळे प्रेक्षकांना मनमुराद हसता आले. शारीरिक अक्षमतेवर मात करून आत्मविश्वासाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, तसेच मैत्री आणि एकमेकांना साथ देण्याचे महत्त्व नाटकातून अधोरेखित करण्यात आले. कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या प्रयोगासाठी प्रेक्षागृह पूर्णपणे भरले (Marathi Bhasha Week)होते.
सायंकाळच्या सत्रात विराज कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचा प्रयोग झाला. सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस यांच्या अभिनयाने सजलेल्या या नाटकातून आजची पिढी प्रेम आणि विवाहाकडे कशा नजरेने पाहते, याचे चित्रण करण्यात आले. विवाहाचा निर्णय घेताना तरुण-तरुणींच्या मनातील संभ्रम, नात्यांमधील अपेक्षा आणि ‘कमिटमेंट’ स्वीकारताना येणाऱ्या अडचणींवर विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात (Marathi Bhasha Week)आले.
आजच्या पिढीशी संबंधित विषय असल्याने नाटकातील अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना स्वतःचे अनुभव जाणवले. मिश्कील संवाद, सहज अभिनय आणि विनोदी प्रसंगांमुळे नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला. मनोरंजनासोबतच बदलत्या नात्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा विचारही नाटकातून मांडण्यात (Marathi Bhasha Week)आला.
‘ऑल दि बेस्ट’मधून विनोद आणि गमती-जमतींच्या माध्यमातून सकारात्मकतेचा संदेश देण्यात आला, तर ‘वरवरचे वधू-वर’मधून बदलत्या काळातील नातेसंबंध, त्यातील गुंतागुंत आणि भावविश्वाचा वेध घेण्यात आला. दोन्ही नाटकांनी रसिकांचे दर्जेदार मनोरंजन (Marathi Bhasha Week)केले.
‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त आयोजित या नाट्यप्रयोगांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. मराठी नाटक, साहित्य, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांबद्दल पिंपरी-चिंचवडकरांची असलेली आस्था या गर्दीतून पुन्हा एकदा दिसून (Marathi Bhasha Week)आली.
गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजीचे कार्यक्रम
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
सकाळी ८.३० वाजता : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विजय पटवर्धन लिखित ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ हे बालनाट्य.
दुपारी १२ वाजता : ‘गजल आख्यान’.
दुपारी ३.३० वाजता : ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’.
सायंकाळी ५.३० वाजता : कवी वैभव जोशी यांच्या स्वरचित कविता-गझलांचा ‘द मनमौजी’.
रात्री ९.३० वाजता : मराठी संगीताचे विविध पैलू उलगडणारा ‘म…मराठीचा’ हा सांगीतिक सोहळा.
नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी
दुपारी १२ वाजता : ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त ‘कथा वंगभंगाची’ हे नाटक.
सायंकाळी ५ वाजता : ‘सूर तरुणाईचा.. ध्यास मराठीचा’ कार्यक्रम. गायक विनल देशमुख, वर्षा एखंडे आणि अश्विनी मिटे सहभागी (Marathi Bhasha Week)होणार.
