(पिंपरी, दि. ७ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त शहरातील विविध सभागृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर आणि नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे बालगीत, नृत्याविष्कार आणि अजय-अतुल यांच्या लोकप्रिय गीतांची सांगीतिक मैफल रंगली. दोन्ही कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद(Abhijat Marathi Bhasha Week) मिळाला.
आचार्य अत्रे रंगमंदिरात भारती न्यायाधीश आणि सहकाऱ्यांनी बालगीतांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाची संकल्पना विजय न्यायाधीश यांची होती. ध्वनी गुप्ता, शौर्यवी मांडवगडे आणि ईरा चायनाकवा या बालकलाकारांनी विविध भक्तीगीते आणि बालगीतांवर नृत्याविष्कार सादर केला. भारती न्यायाधीश यांनीही सुरेल गायनाने कार्यक्रमाची रंगत (Abhijat Marathi Bhasha Week)वाढवली.
‘या हो या गणपती बाप्पा या हो या’, ‘कावळे दादा काव काव’, ‘आमच्या घरची मनीमाऊ’, ‘कोंबडीने शिकवले पिल्लाला’ आणि ‘डूबी डूबी डम डम’ आदी गीतांवरील सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद (Abhijat Marathi Bhasha Week)दिली.
यावेळी प्रशासन अधिकारी दत्ता सूर्यवंशी, नेहरूनगर येथील महापालिका उर्दू शाळेतील शिक्षक रोहिणी हरकारे, मनीषा प्रसाद, सालेहा तांबोळी, मोहम्मद सय्यद तसेच नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले. आभार दत्ता सूर्यवंशी यांनी (Abhijat Marathi Bhasha Week)मानले.
दरम्यान, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे अमीर शेख व चंद्रकांत नगरकर प्रस्तुत ‘सदाबहार अजय-अतुल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अजय-अतुल यांच्या लोकप्रिय गीतांसह लावणी, प्रभावी गायन आणि दमदार वाद्यवृंदामुळे मैफल (Abhijat Marathi Bhasha Week)रंगली.
‘हळद पिवळी’, ‘जीव रंगला गुंतला’, ‘सैराट झालं जी’, ‘वाऱ्यावरती गंध पसरला’, ‘बहरला हा मधुमास’, ‘गालावर खळी, डोळ्यात धुंदी’ आणि ‘आताच बया का बावरलं’ या गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही गीतांदरम्यान वादकांनी स्वतंत्र वादन सादर करत आपल्या कलाकौशल्याची झलक (Abhijat Marathi Bhasha Week)दाखवली.
लावणीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. पारंपरिक लोककलेचा ठेका आणि उत्साहपूर्ण सादरीकरणामुळे रंगमंदिरातील वातावरण जल्लोषमय (Abhijat Marathi Bhasha Week)झाले.
कविता राम, संदीप उबाळे, आशिष देशमुख, झैनुल, मोहम्मद रफी शेख आणि कविता सेंजर यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले. वाद्यवृंदाने त्यांना समर्थ साथ दिली. निवेदन अभय गोखले यांनी (Abhijat Marathi Bhasha Week)केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य समन्वयक समीर सूर्यवंशी तसेच समन्वयक वैजयंती भालेराव आणि स्मिता देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका (Abhijat Marathi Bhasha Week)बजावली.
