Home गुन्हे PCMC Action: चिखलीत ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १२०० चौ.मी. बांधकाम निष्कासित

PCMC Action: चिखलीत ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १२०० चौ.मी. बांधकाम निष्कासित

पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखलीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई. सुमारे १२०० चौरस मीटर बांधकाम निष्कासित करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ५० जवानांसह पथक तैनात.

by Admin
Spread the love

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२०० चौरस मीटर बांधकाम निष्कासित करण्यात (PCMC Action)आले.

 

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल्ल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित(PCMC Action) होते.

 

कारवाईसाठी सहा पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान, महापालिकेचे दोन मजूर आणि १० कंत्राटी मजूर तैनात करण्यात आले होते. तसेच दोन ट्रॅक्टर, दोन ब्रेकर आणि दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात (PCMC Action)आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00