(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२०० चौरस मीटर बांधकाम निष्कासित करण्यात (PCMC Action)आले.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल्ल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित(PCMC Action) होते.
कारवाईसाठी सहा पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान, महापालिकेचे दोन मजूर आणि १० कंत्राटी मजूर तैनात करण्यात आले होते. तसेच दोन ट्रॅक्टर, दोन ब्रेकर आणि दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात (PCMC Action)आला.
