(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत टेरेसवर अडकलेल्या सुमारे १५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. यामध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि काही रुग्णांचा समावेश (Kunal Market Fire)होता.
या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली असून, तिला उपचारासाठी तालेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य अग्निशमन केंद्रासह प्राधिकरण, थेरगाव आणि नेहरूनगर येथील केंद्रांमधून चार अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल (Kunal Market Fire)झाली.
आगीमध्ये पार्किंगमधील १७ दुचाकी, दोन चारचाकी वाहने, एक सायकल आणि काही वायरिंग साहित्य जळून नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी (Kunal Market Fire)टळली.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि घटनास्थळी गर्दी टाळावी, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले (Kunal Market Fire)आहे.
