(पिंपरी, दि. ३ नोव्हेंबर २०२६) : पिंपरीतील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग लगतच्या दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग विझविताना दोन अग्निशमन जवान किरकोळ जखमी (Shagun Chowk Fire)झाले.
मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्य अग्निशमन केंद्रासह नेहरूनगर, थेरगाव आणि रहाटणी केंद्रांतील अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी दोन्ही दुकानांमध्ये कोणी अडकले नसल्याची खात्री करून विविध दिशांनी पाण्याचा मारा सुरू केला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात (Shagun Chowk Fire)आले.
दोन्ही दुकानांमध्ये पूजा साहित्य आणि इतर वस्तूंचा साठा असल्याने मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे परिसरातील इतर दुकानांचे संभाव्य नुकसान(Shagun Chowk Fire) टळले.
या मोहिमेदरम्यान फायरमन प्रणय शिर्के आणि फायरमन आदिल गोडे हे दोन जवान किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात (Shagun Chowk Fire)आले.
उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, लीडिंग फायरमन विजय घुगे, फायरमन प्रणय शिर्के, फायरमन आदिल गोडे यांच्यासह विविध अग्निशमन केंद्रांतील जवानांनी या मोहिमेत सहभाग(Shagun Chowk Fire) घेतला.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी. आग लागल्याचे निदर्शनास आल्यास १०१ या अग्निशमन दलाच्या क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केले (Shagun Chowk Fire)आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अग्निशमन जवानांच्या तत्परतेचे कौतुक केले. नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण हे अग्निशमन दलाचे सर्वोच्च प्राधान्य असून, जवानांच्या समन्वयपूर्ण कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे त्यांनी (Shagun Chowk Fire)सांगितले.
