(चिंचवड, ता. ३०) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’चे उद्घाटन प्रतिभा महाविद्यालयात उत्साहात झाले. या रोजगार मेळाव्यासाठी जळगाव, अमरावती, अहिल्यानगर, संभाजीनगर, मंचर, चाकण, सातारा, कोल्हापूर, पुणे, लोणावळा, तळेगाव, कल्याण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित(Pratibha Job Fair 2026)होते.
विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय मंडलिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच फुगे सोडून जॉब फेअरचे उद्घाटन करण्यात (Pratibha Job Fair 2026)आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा ग्रुपचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा होते. यावेळी संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालक डॉ. तेजल शहा, विश्वस्त शैलेश शहा, तळेगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षा अमृता कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका डॉ. वृंदा जोशी-मुलतानी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालक डॉ. तेजल शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात(Pratibha Job Fair 2026) आला.
डॉ. धनंजय मंडलिक म्हणाले, “या जॉब फेअरमध्ये ९२ कंपन्यांनी सहभाग घेतला असून ४५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच आज पाच हजार जणांनी उपस्थिती दर्शविली, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. या उपक्रमाची राज्य सरकारही दखल (Pratibha Job Fair 2026)घेईल.”
“नोकरी मिळविण्यासाठी केवळ पदवी घेणे पुरेसे नाही. त्यासोबत आवश्यक पूरक कौशल्ये आत्मसात करणे आणि आई-वडील व शिक्षकांच्या संस्कारांची जोड असणे गरजेचे आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण कसे बोलतो, आपली देहबोली आणि वर्तणूक कशी आहे, हेही महत्त्वाचे आहे. आजच्या जॉब फेअरमध्ये सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही; मात्र मिळालेल्या संधीचे सोने करा. झालेल्या चुका दुरुस्त करून आपण कुठे कमी पडतो, हे ओळखा. ज्यांना यश मिळणार नाही, त्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन करावे. उमेदवारांनी आत्मविश्वासाने पुढील मुलाखतीला सामोरे जावे. कर्तृत्व असेल तर नोकरी नक्कीच मिळेल. भविष्यात उत्तम आयुष्य जगण्यासाठी स्वतःला सक्षम करा,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी चाणक्यनीतीतील दाखलेही(Pratibha Job Fair 2026) दिले.
आमदार उमा खापरे म्हणाल्या, “पदवीधर युवकांच्या हाती काम आणि योग्य संधी वेळीच मिळावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. काहींना नोकरी मिळेल, तर काहींना मिळणार नाही; मात्र कंपन्यांशी नोकरीच्या निमित्ताने संपर्क होणे हीदेखील महत्त्वाची बाब आहे. प्रतिभा महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध उपक्रम राबविले (Pratibha Job Fair 2026)आहेत.”
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “प्रतिभा महाविद्यालयाचा हा अकरावा जॉब फेअर आहे. आतापर्यंत बी.कॉम., बी.एड., बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एस्सी., एम.कॉम., एम.बी.ए., एम.सी.ए., एम.एस्सी., बी.ई., बी.टेक., एम.ई., एम.टेक. आदी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या आमच्या तसेच इतर महाविद्यालयांतील पाच हजारांहून अधिक उमेदवारांना मागील दहा जॉब फेअरच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदाच्या अकराव्या जॉब फेअरमध्येही मोठ्या प्रमाणावर उमेदवारांना नोकरीच्या संधी (Pratibha Job Fair 2026)मिळतील.”
“हे संस्थेच्या सामूहिक प्रयत्न आणि अथक परिश्रमातून शक्य झाले आहे. नोकरी किंवा व्यवसाय करताना कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. पगार किती मिळतो यापेक्षा मिळालेली संधी आपल्या कौशल्याच्या विकासासाठी किती महत्त्वाची आहे, हे पाहणे गरजेचे आहे. मुलाखतीत अपयश आले तरी खचून जाऊ नका. झालेल्या चुका दुरुस्त करून आपण कुठे कमी पडलो, हे लक्षात घ्या आणि आत्मविश्वासाने पुढील मुलाखतीला सामोरे जा. तुमच्यात कर्तृत्व असेल तर नोकरी नक्कीच मिळेल. आव्हानांना सामोरे जा आणि आलेल्या प्रत्येक संकटावर मात करायला शिका. काही वर्षे नोकरी करून अनुभव मिळवल्यानंतर भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणारे व्यावसायिक बना. स्वतःची आणि आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करा,” असा कानमंत्र देत त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा(Pratibha Job Fair 2026) दिल्या.
जॉब फेअरला भेट दिलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, “पुरेसे ज्ञान असण्याबरोबरच चांगला संवाद साधता आला पाहिजे. समूहात काम करताना ‘मी’पणा असता कामा नये. उद्भवणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची क्षमता अंगी असणे आवश्यक(Pratibha Job Fair 2026) आहे.”
यंदा मोठ्या प्रमाणावर कंपन्यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालक डॉ. तेजल शहा यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे संचालक, उद्योगसमूहातील मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विभाग अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील डॉ. हर्षिता वाच्छाणी, डॉ. हनुमंता कोळी, डॉ. गुरुराज डांगरे, सायली आमले, अंशूम वर्मा, वहीदा पठाण आणि डॉ. मनीष पाटणकर यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात(Pratibha Job Fair 2026) आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी केले, तर आभार प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी यांनी मानले. जॉब फेअर २०२६ यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम (Pratibha Job Fair 2026)घेतले.
