(चिंचवड, दि. १२) : कमला एज्युकेशन सोसायटी संचलित चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड शहरस्तरीय आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये शहरातील १९ शैक्षणिक संस्थांमधील १७७ विद्यार्थ्यांनी सहभाग (Pratibha Junior College)घेतला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भाषिक कौशल्ये विकसित करणे आणि स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने वक्तृत्व, निबंधलेखन, कथाकथन आणि एकपात्री नाटक या चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमधून आपली सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि अभिव्यक्तिकौशल्यांचे प्रभावी सादरीकरण (Pratibha Junior College)केले.
प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे आणि प्रथम नोंदणी करणाऱ्या शिक्षिका तनीषा आंबरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात (Pratibha Junior College)आले.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :
वक्तृत्व स्पर्धा : प्रथम क्रमांक रविना चौधरी आणि वेदिका विभूते, द्वितीय क्रमांक सोनाली वाघमारे, तृतीय क्रमांक सिद्धी माने.
निबंधलेखन स्पर्धा : प्रथम क्रमांक जोहा सुलतान मोमीन आणि श्रुती समर्थ स्वामी, द्वितीय क्रमांक श्रुती बिरादार, तृतीय क्रमांक गौरी राजू लष्करे.
कथाकथन स्पर्धा : प्रथम क्रमांक अनुष्का मौर्या, द्वितीय क्रमांक सुजाता सरोज आणि अंकिता वरुण, तृतीय क्रमांक सलोनी कांबळे.
एकपात्री नाटक स्पर्धा : प्रथम क्रमांक ऐश्वर्या यादव, द्वितीय क्रमांक नव्या सिंह, तृतीय क्रमांक कुंजन भाटी.
स्पर्धांचे परीक्षण डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. महिमा सिंह, डॉ. सुवर्णा गोगटे, प्रा. गीता कांबळे, प्रा. सुशील भोंग, डॉ. राजश्री ननावरे, डॉ. संतोष उमाठे आणि प्रा. अमोल पाटील यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करून त्यांच्या गुणवत्तेला योग्य न्याय (Pratibha Junior College)दिला.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रेरणा मिळत असल्याचे प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. भाषा विभागप्रमुख प्रा. सुरेखा कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम (Pratibha Junior College)घेतले.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना विचार प्रभावीपणे मांडण्याची, भाषेवरील प्रभुत्व वाढविण्याची, कल्पकतेला वाव देण्याची आणि आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची संधी मिळाली. सर्व विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात (Pratibha Junior College)आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी केले, तर प्रा. स्नेहल साळवी यांनी आभार (Pratibha Junior College)मानले.


