(पिंपरी-चिंचवड) : कामावर जाणाऱ्या २४ वर्षीय तरुणीवर तिच्या मित्रानेच चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली. लग्नास नकार दिल्याने आणि कंपनीतून काढून टाकल्याचा राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद (PCMC Crime News)आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोनुकुमार भोला राय (वय २४, रा. सुखकर्ता सोसायटी, हिंजवडी; मूळ रा. बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
पीडित तरुणी आणि तिची बहीण हिंजवडी येथील परमार पीजीजवळून पायी कामावर जात असताना आरोपी मोनुकुमार तेथे आला. “तुझ्यामुळे मला कंपनीतून काढून टाकले आहे. तू माझ्याशी लग्न कर,” असे म्हणत त्याने तरुणीवर दबाव टाकला. तिने लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिला खाली (PCMC Crime News)पाडले.
त्यानंतर “तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपीने चाकूने तिच्या छातीवर, मनगटावर, पाठीवर आणि कानाजवळ वार केले. तरुणीला वाचवण्यासाठी तिची बहीण पुढे आली असता आरोपीने तिलाही धमकी (PCMC Crime News)दिली.
या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून, हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत(PCMC Crime News) आहेत.
