(पिंपरी-चिंचवड ): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत पथसंचलने उत्साहात पार पडली. शहरातील २७ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या संचलनांमध्ये हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. विविध ठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली. तसेच ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून (RSS Path Sanchalan)गेला.
राष्ट्रहित आणि सेवाकार्याचा संदेश देण्यासाठी विजयादशमीच्या निमित्ताने या पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) देहू आणि देहूरोड परिसरात संचलने झाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी दापोडी, वाल्हेकरवाडी, रावेत, हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, वाकड, थेरगाव, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, संत तुकारामनगर, संभाजीनगर-पुर्णानगर, यमुनानगर-निगडी, चिखली आणि आळंदी यांसह विविध भागांत पथसंचलने पार पडली. आकुर्डी, डुडुळगाव आणि मोशी येथे सायंकाळी नियोजित मार्गांवर संचलनाचे आयोजन करण्यात आले(RSS Path Sanchalan) होते.
पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी घोषाच्या लयबद्ध तालावर शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. हातात दंड घेतलेल्या स्वयंसेवकांच्या रांगा, एकसारखा गणवेश आणि संचलनात अग्रभागी असलेला भगवा ध्वज यांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. संचलनातून स्वयंसेवकांची शिस्त आणि संघभावना दिसून (RSS Path Sanchalan)आली.
शहरातील विविध भागांत नागरिकांनी स्वयंप्रेरणेने रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. स्वयंसेवकांचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रमुख अतिथी आणि लोकप्रतिनिधींनीही वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या संचलनांना उपस्थिती(RSS Path Sanchalan) लावली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. शहरातील विविध भागांत आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलनांमधून स्वयंसेवकांचा मोठा सहभाग आणि विजयादशमी उत्सवाचा उत्साह पाहायला (RSS Path Sanchalan)मिळाला.

