(विवेक कुलकर्णी ): ग्लेन फिलिप्सच्या तडाखेबंद शतकासह मायकेल ब्रेसवेलच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा ८७ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत पहिला विजय नोंदवला. ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावर झालेल्या सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे(IND vs NZ 4th T20) कोलमडली.
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत २० षटकांत ७ बाद २५९ धावांचा डोंगर उभा केला. ग्लेन फिलिप्सने अवघ्या ४९ चेंडूंत ६ चौकार आणि १० षटकारांसह १०७ धावांची वादळी खेळी केली. मायकेल ब्रेसवेलने २५ चेंडूंत ६५ धावा ठोकत त्याला उत्तम साथ दिली. फिन अॅलनने ३१, तर डॅरिल मिचेलने २४ धावांचे योगदान (IND vs NZ 4th T20)दिले.
२६० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला २० षटकांत ९ बाद १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या ४ धावांवर, तर इशान किशन खातेही न उघडता माघारी परतला. अभिषेक शर्मा (२७) आणि श्रेयस अय्यर (२२) यांनी आक्रमक सुरुवात केली; मात्र त्यांना मोठी खेळी करता आली(IND vs NZ 4th T20) नाही.
तिलक वर्माने ३५ धावा, नमन धीरने १३ चेंडूंत २८ धावा, तर प्रिन्स यादवने नाबाद १८ धावा केल्या. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची डाळ शिजली(IND vs NZ 4th T20) नाही.
न्यूझीलंडकडून जेकब डफीने सर्वाधिक ४ बळी घेत भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. मिचेल सँटनरने २, तर मॅथ्यू फिशरने २ बळी मिळवले. अॅडम मिल्नेने एक गडी बाद (IND vs NZ 4th T20)केला.
विशेष म्हणजे, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या श्रेयस अय्यरच्या संघाला यावेळी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ग्लेन फिलिप्सची आक्रमक फलंदाजी आणि जेकब डफीची भेदक गोलंदाजी न्यूझीलंडच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये (IND vs NZ 4th T20)ठरली.
