(प्रतिनिधी )भक्ती-शक्ती ते त्रिवेणीनगर स्पाईन रोडवरील चौकाजवळील रस्त्याच्या दुभाजकावर कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर निधीतून १,६६६ चौरस मीटर क्षेत्रात ‘पब्लिक अर्बन फॉरेस्ट’ (प्लॉट-सी) विकसित करण्यात आले आहे. ग्रीन यात्रा या कंपनीकडे या प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी शेकडो झाडांची रोपे चांगल्या स्थितीत आहेत. मात्र, नियमित पाणीपुरवठा व सिंचन न झाल्यास उन्हाच्या तीव्रतेमुळे ही रोपे वाळून जाण्याची भीती व्यक्त होतPublicUrbanForest) आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील ही हरितसंपदा नष्ट होण्यापूर्वीच तिच्या देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, या प्रकल्पाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारचा वृक्षारोपण प्रकल्प अंकुश चौक ते घरकुल चौकादरम्यानही राबविण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या वृक्षांना नियमित पाणीपुरवठा करून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी आणि शिक्षक गणेश भोने यांनी केलीPublicUrbanForest )आहे.
— गणेश भोने,
निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते
पिंपरी-चिंचवड
