(पिंपरी, दि. २३ ऑक्टोबर २०२६): स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश (Cleanliness Drive)दिला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करणे, रस्त्यावर कचरा न टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश(Cleanliness Drive) होता.
या उपक्रमाला ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने आणि आरोग्य निरीक्षक कोमल फर्डे यांचे मार्गदर्शन(Cleanliness Drive) लाभले.
स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी घेऊन हाताळावयाचा कचरा अशा चार प्रकारांत कचऱ्याचे वर्गीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीत द्यावा, असे आवाहन करण्यात(Cleanliness Drive) आले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून स्वच्छतेच्या सवयी रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंब आणि समाजावर होतो. नागरिकांनी कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांत सक्रिय सहभाग(Cleanliness Drive) घ्यावा.”
उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवावा. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहराची निर्मिती शक्य (Cleanliness Drive)आहे.”
