(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. तसेच महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक विभागाने खर्चात बचत करण्यावर भर द्यावा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी (Abhishek Barne)दिले.
स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी देण्यासोबतच महापालिकेच्या विभागनिहाय कामकाजाचा आणि आर्थिक नियोजनाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाने खर्चात बचतीसाठी उपाययोजनांचा सविस्तर अहवाल दहा दिवसांत सादर करावा, असे आदेश बारणे यांनी (Abhishek Barne)दिले.
महापालिकेच्या वापराविना असलेल्या मालमत्तांचा योग्य विनियोग करून उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची शंभर टक्के बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असून, हजेरीत कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात (Abhishek Barne)आला.
अर्थसंकल्पात मंजूर झालेली विकासकामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. प्रलंबित कामे आणि मंजूर निधीच्या विनियोगाबाबत दहा दिवसांत अहवाल सादर करावा. अधिकाऱ्यांनी फायली विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत. विलंब झाल्यास त्याची कारणे लेखी स्वरूपात द्यावीत, असेही बारणे यांनी स्पष्ट (Abhishek Barne)केले.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्यावर सोपविलेली कामे आणि प्रत्यक्ष कामकाज यांचाही आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. जनतेच्या पैशाचा योग्य वापर, खर्चात बचत आणि विकासकामांची वेळेत पूर्तता याला प्राधान्य देऊन सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा अभिषेक बारणे यांनी व्यक्त (Abhishek Barne)केली.
