(पिंपरी-चिंचवड ): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता-२ प्रमोद सुधाकर ओभासे यांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निलंबित केले आहे. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक झाल्याच्या दिनांकापासून त्यांचे निलंबन लागू करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले (Pramod Obhase Suspended)आहेत.
३८ लाखांच्या बिलाच्या फाईलवर सहीसाठी १९ हजारांची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या ३८ लाख रुपयांच्या टेंडरच्या फाईलवर सही करण्यासाठी प्रमोद ओभासे यांनी १९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पाणीपुरवठा विभागाच्या केबिनमध्ये एसीबीने केलेल्या पडताळणीत हा प्रकार निष्पन्न झाला. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून २९ ऑक्टोबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली(Pramod Obhase Suspended) आहे.
१५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश
लोकसेवकाने पदाचा गैरवापर करून गैरवर्तन केल्याने महापालिकेची प्रतिमा मलीन झाल्याचे नमूद करत, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. निलंबन काळात ओभासे यांचे मुख्यालय महापालिकेचे स्थापत्य मुख्य कार्यालय राहणार असून, पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, पुढील १५ दिवसांत दोषारोपपत्र ठेवून विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले (Pramod Obhase Suspended)आहेत.
