(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर 🙂 शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेतच करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात(Pcmc Vijay Suryavanshi) आले.
शून्य कचरा संकल्पना शहराला कचरामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. थेरगाव शाळेत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचे परिणाम आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून इतर शाळांमध्येही तो सुरू करण्याचे नियोजन आहे, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी (Pcmc Vijay Suryavanshi)सांगितले.
या उपक्रमांतर्गत शाळेत ‘शून्य कचरा मॉनिटर’ नेमण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन आणि परिसर स्वच्छतेबाबत जागरूक केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी घरातही कचऱ्याचे वर्गीकरण व योग्य विल्हेवाट लावण्याबाबत पालकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना शून्य कचरा रिसायकल बॅग, किट आणि ‘स्वच्छता के सुपरहीरोज’ या पुस्तकाचे वाटप करण्यात (Pcmc Vijay Suryavanshi)आले.
कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर, शिक्षण समिती सदस्या तथा नगरसदस्या रिटा सानप, नगरसदस्या योगिता बारणे, नगरसदस्य तानाजी बारणे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका अर्चना कांडेकर, ज्योती तापकीर, शून्य कचरा शाळा मार्गदर्शक अर्चना मोरे, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रकल्पासाठी योगिता बारणे यांनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक त्यांनी केले, तर आभार संगीता बांगर यांनी(Pcmc Vijay Suryavanshi) मानले.
दरम्यान, आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक शाळेलाही भेट दिली. तेथे अॅस्ट्रोनॉमी लॅब, टिंकरिंग लॅब, रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र आणि सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांनी भिंतीवर साकारलेल्या वारली चित्रांचे कौतुक(Pcmc Vijay Suryavanshi) केले.
