(विशेष प्रतिनिधी, पुणे):पुणे: हिंजवडी फेज ३ ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो लाईन ३ (Pune Metro Line 3) प्रकल्पाच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे सध्या या मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘पोलीस मित्र समिती, महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि महा-मेट्रोच्या आयुक्त व व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन सादर करण्यात आले आहे. मेट्रोचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ही सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी पुणेकरांच्या वतीने करण्यात आली (Pune Metro Line 3)आहे.
पोलीस मित्र समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. कुणाल भोसले यांनी हे निवेदन प्रशासनाला दिले आहे. हिंजवडी आयटी पार्क (फेज ३) ते शिवाजीनगर या संपूर्ण मार्गावर दररोज वाहनांच्या प्रचंड रांगा लागत असून, याचा थेट फटका सामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले आणि हजारो आयटी कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे निवेदनात म्हटले (Pune Metro Line 3)आहे.
पोलीस प्रशासनावरही वाढतोय ताण
कुणाल भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “पोलीस मित्र समितीचा एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने, शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाशी आमचा थेट संबंध येतो. रस्त्यांवर तासनतास होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तीव्र मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामना करावा लागत आहे. तसेच, यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागावरही कामाचा प्रचंड ताण निर्माण होत (Pune Metro Line 3)आहे.”
PMRDA मुख्य अभियंता श्रीमती रिनाज पठाण मॅडम यांच्याशी चर्चा
या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस मित्र समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल भोसले यांनी PMRDA च्या मुख्य अभियंता श्रीमती रिनाज पठाण मॅडम यांची भेट घेऊन या समस्येवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान रिनाज पठाण मॅडम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली की, मेट्रो प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबरपर्यंत हिंजवडी ते शिवाजीनगर स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन (Pune Metro Line 3)आहे.
समितीने हा मेट्रो मार्ग लवकरात लवकर सार्वजनिक सेवेत दाखल करण्याची मागणी करत खालील मुद्दे उपस्थित केले आहेत:
• वाहतूक कोंडीतून मुक्ती: रस्त्यांवरील खाजगी वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटेल.
• वेळ आणि इंधनाची बचत: चाकरमान्यांचा प्रवासाचा मौल्यवान वेळ वाचेल आणि इंधनाची मोठी बचत होईल.
• सार्वजनिक सुरक्षा: रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि नागरिकांची सुरक्षा(Pune Metro Line 3) वाढेल.
अंतिम टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरक्षा चाचण्या (CMRS) व तांत्रिक प्रक्रिया सुरू आहेत, ही कौतुकास्पद बाब असली तरी जनहिताचा विचार करता प्रशासनाने उर्वरित कामाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. समस्त पुणेकरांच्या त्रासाचा अंत करण्यासाठी हा मेट्रो मार्ग नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबरपर्यंत सुरू करावा, अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाकडून यावर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षाही कुणाल भोसले यांनी व्यक्त केली (Pune Metro Line 3)आहे.

