(पिंपरी) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करणाऱ्या युगांडाच्या तीन महिलांवर कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील मारुंजी येथील हॅपी होम्स परिसरातून या महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना मायदेशी परत पाठविण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली (Overstay Foreigners)आहे.
१३ ऑक्टोबर रोजी एफआरओच्या पथकाने मारुंजी येथील सर्व्हे क्रमांक ७/४ मधील हॅपी होम्सच्या शॉप क्रमांक ३ येथे तपासणी केली. त्यावेळी डॉरेक अहाईसब्वे, प्रोसी अंकुंडा आणि अमिना कातुसीमे या तीन महिला आढळल्या. त्यांनी मूळ पासपोर्ट व व्हिसाऐवजी कागदपत्रांच्या छायाप्रती सादर केल्या. पुढील पडताळणीत तिघींच्या व्हिसाची मुदत संपल्याचे निष्पन्न(Overstay Foreigners) झाले.
डॉरेक अहाईसब्वे हिचा विद्यार्थी व्हिसा ७ ऑक्टोबर २०२६ रोजी, तर प्रोसी अंकुंडा आणि अमिना कातुसीमे यांचा वैद्यकीय व्हिसा अनुक्रमे २९ डिसेंबर २०२५ आणि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संपला होता. मुदतवाढ न घेता भारतात वास्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात (Overstay Foreigners)आली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा यांच्या पथकाने ही कारवाई(Overstay Foreigners) केली.
दरम्यान, परदेशी नागरिकांना घर, फ्लॅट, बंगला किंवा हॉटेलमध्ये निवासासाठी ठेवल्यास २४ तासांच्या आत एफआरओकडे सी-फॉर्म भरणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला (Overstay Foreigners)आहे.
