(पिंपरी, दि. १५) : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात (APJ Abdul Kalam)आले.
पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमास महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपायुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव उपस्थित (APJ Abdul Kalam)होते.
विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात डॉ. कलाम यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य आणि तरुण पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत (APJ Abdul Kalam)आहेत.




