(पिंपरी-चिंचवड ): दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रतिष्ठान, निगडी गावठाण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दीपमहोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरात १५ हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता या प्रकाशसोहळ्याला सुरुवात होणार(Madhukar Pawale Pratishthan) आहे.
प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा तथा माजी नगरसेवक दत्तात्रय (नाना) रामचंद्र पवळे आणि कार्याध्यक्ष ओमकार दत्तात्रय पवळे यांच्या पुढाकारातून गेल्या २५ वर्षांपासून हा दीपमहोत्सव अखंडपणे आयोजित केला जात आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्यासोबतच सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो. यंदा १५ हजार दिव्यांच्या प्रकाशाने भक्ती-शक्ती परिसर उजळून निघणार (Madhukar Pawale Pratishthan) आहे.
या सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णासाहेब बनसोडे, शंकरशेठ जगताप, महेश लांडगे, सुनील शेळके, अश्विनीताई जगताप, अमित गोरखे, संजोग वाघेरे, किरण चोपडा आणि डॉ. धर्मेंद्र शर्मा यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच शहराच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत योगदान देणारे दिवंगत नेते लक्ष्मणभाऊ जगताप यांना यावेळी अभिवादन करण्यात येणार (Madhukar Pawale Pratishthan) आहे.
दीपमहोत्सवाच्या आयोजनासाठी दत्तात्रय (नाना) पवळे, माजी नगरसेविका सुनंदाताई पवळे, कार्याध्यक्ष ओमकार पवळे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या रौप्यमहोत्सवी दीपोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Madhukar Pawale Pratishthan) आहे.
