(पिंपरी-चिंचवड ): भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासह पक्षांतर्गत शिस्त आणि अनुशासन कायम राखण्यासाठी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीची घोषणा करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या समितीची घोषणा केली. समितीत ज्येष्ठ कार्यकर्ते, विधिज्ञ, लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या सहा जणांचा समावेश(BJP Disciplinary Committee) आहे.
या समितीमध्ये सदाशिव दादासाहेब खाडे, आमदार उमा गिरीश खापरे, ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे, ॲड. गोरखनाथ गेनबा झोळ, प्रशांत कृष्णराव शितोळे आणि विकास हरिश्चंद्र डोळस यांचा समावेश(BJP Disciplinary Committee) आहे.
पक्षांतर्गत शिस्त बळकट करणे, संघटनात्मक कामकाजात समन्वय वाढवणे आणि पक्षाची प्रतिमा जपणे, ही समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. पक्षाची शिस्त न पाळणे, पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे किंवा पक्षविरोधी भूमिका घेणे अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे अधिकार समितीला देण्यात आले (BJP Disciplinary Committee)आहेत.
निवडणुकीच्या काळात खोट्या बातम्या आणि चुकीच्या प्रचाराला बळी न पडता कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार काम करावे, तसेच संघटनेचा विस्तार आणि पक्षाचे कामकाज अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी ही समिती कार्यरत राहणार (BJP Disciplinary Committee)आहे.

