(पिंपरी ): मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना या मुदतवाढीचा लाभ घेता येणार आहे. मतदारांना पाठविलेल्या नोटिशींना उत्तर देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदींबाबत हरकती दाखल करण्यासाठीही ही मुदत लागू (SIR Campaign 2026)असेल.
राज्यात ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत पूर्वीच्या यादीतील सुमारे दोन कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांना पुन्हा नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत सात लाख १९ हजार ३८२ मतदारांनी नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक सहामध्ये अर्ज केले आहेत. मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करण्यासाठी नमुना क्रमांक आठमध्ये तीन लाख ९९ हजार ९२५, तर नावे वगळण्यासाठी नमुना क्रमांक सातमध्ये १८ हजार ७४८ अर्ज दाखल झाले (SIR Campaign 2026)आहेत.
मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रारूप मतदार यादी अंतिम केल्यानंतर मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुदतवाढीची मागणी केली (SIR Campaign 2026)होती.
नवमतदारांना अर्जाची संधी
१ ऑक्टोबर या अर्हता दिनांकाला किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना तसेच अन्य पात्र नागरिकांना नमुना क्रमांक सहा भरून नाव नोंदविता येणार आहे. यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे अर्ज सादर करता येतील. ऑनलाइन अर्जासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता(SIR Campaign 2026) येईल.
कागदपत्रांसाठी पर्यायी व्यवस्था
आयोगाच्या नोटिशीत आधार कार्ड, शिधापत्रिका आणि पासपोर्टसह १३ प्रकारच्या कागदपत्रांचा उल्लेख आहे. आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध दस्तऐवज सादर करता येतील. यासाठी बीएलओ ॲपमध्ये ‘अन्य कागदपत्रे’ (Any Other Documents) हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला(SIR Campaign 2026) आहे.
