(पिंपरी-चिंचवड, दि. २९ सप्टेंबर २०२६ ): भांडवलशाहीच्या व्यवस्थेत कामगार हा कंपनीचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कंपनी किंवा संस्थेकडून कामगारांवर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. कामगारांच्या हिताचा अजेंडा राबविताना त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण, शिक्षण, आरोग्य आणि विविध सोयी-सुविधांचाही विचार केला पाहिजे. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारसोबत संवाद साधून कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा. भाजप कामगारांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी( Mathadi Workers)केले.
भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियन (रजि.) यांच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मंगळवारी (दि. २९) राज्यस्तरीय माथाडी पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण बोलत( Mathadi Workers) होते.
मेळाव्यास महापौर रवि लांडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, युनियनचे अध्यक्ष विजय हरगुडे, जयदीप खापरे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, अक्षय वरघडे, राकेश सणस, वसीम शेख आदी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करण्यात( Mathadi Workers) आले.
चव्हाण म्हणाले की, शिखर संघटना सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असेल, तर ती कौतुकास्पद बाब आहे. कामगारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविताना त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाचाही विचार केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांच्या माध्यमातून २५ कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दारिद्र्यरेषेखालून बाहेर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी( Mathadi Workers) केला.
पूर्वीच्या कामगार कायद्यांमुळे कामगारांना अडचणी येत होत्या. त्यामध्ये आवश्यक सुधारणा करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. कामगारांच्या कल्याणासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करताना संघटनांनाही अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. संघटनांनी सरकारसोबत चर्चा करून कायदेशीर पद्धतीने कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी( Mathadi Workers) केले.
यावेळी युनियनचे संस्थापक तथा कामगार नेते अनुप मोरे म्हणाले की, ही संघटना पक्षाने जन्माला घातलेले बाळ आहे. २०१४ मध्ये माथाडी युनियनची सुरुवात केली असून, राज्यभरातून आतापर्यंत १५ हजार सदस्य जोडले आहेत. २०२९ पर्यंत ५० हजार सदस्य जोडण्याचे लक्ष्य आहे. २०२९ मध्ये राज्यात आणि देशात सत्ता आणण्यासाठी संघटनेचा सिंहाचा वाटा असेल, असा शब्द देत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन( Mathadi Workers) केले.

“तुम्ही आमच्या पाठीशी राहा. आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमच्यामुळेच मला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली असून, या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे मोरे यांनी ( Mathadi Workers)सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी संतोष कांबळे यांनी आभार मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप ( Mathadi Workers)झाला.





