(पिंपरी-चिंचवड ): दिवाळीनिमित्त मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ स्मारक परिसरात १००१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हेल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘दीप उत्सव सोहळा २०२६’ अंतर्गत ‘पहिला दिवा माझ्या राजासाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दीपप्रज्वलनातून मानवंदना देण्यात (Statue of Hindubhushan)आली.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकातील सुमारे १४० फूट उंचीच्या पुतळ्याची निर्मिती जागतिक कीर्तीचे शिल्पकार स्वर्गीय राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठेचे विचार भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा या स्मारकाचा प्रमुख उद्देश(Statue of Hindubhushan) आहे.
या परिसरात ऐतिहासिक ‘शंभूसृष्टी’ विकसित करण्याची संकल्पना असून, त्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह स्वराज्यातील सरदार आणि मावळ्यांचे पुतळे, ऐतिहासिक प्रसंगांवरील शिल्पे, भित्तिचित्रे, खुला रंगमंच आणि आधुनिक दृकश्राव्य सुविधांचा समावेश प्रस्तावित आहे. स्मारकाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रेरणाकेंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू (Statue of Hindubhushan)आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “केवळ भव्य पुतळा उभारणे हा उद्देश नव्हता, तर शिवशंभूंचा इतिहास, त्यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचे विचार नव्या पिढीच्या मनात रुजवणे हे स्वप्न होते. पुतळ्याची उंची जग पाहील; मात्र शिवशंभूंच्या विचारांची उंची भावी पिढ्यांच्या कर्तृत्वातून दिसली (Statue of Hindubhushan)पाहिजे.”
दुष्काळी परिस्थितीशी लढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि बळीराजासाठी दुसरा दिवा प्रज्वलित करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त(Statue of Hindubhushan) केला.
