(पिंपरी, दि. ३१) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि एआय डेटा सेंटरविरोधात शेतकरी व कष्टकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांजणी येथे सोलापूर-पुणे महामार्गावर शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात (Ujani Dam Project)आले.
आमदार रोहित पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील शेतकरी, कामगार आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पिंपरी-चिंचवडमधून माजी नगरसेवक मारुती भापकर आणि कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आंदोलनात सहभागी होत शेतकरी-कष्टकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा (Ujani Dam Project)दिला.
यावेळी मारुती भापकर म्हणाले की, उजनी धरण क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, हायड्रोजन आणि अणुऊर्जा प्रकल्पांमुळे तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी, मच्छीमार, आदिवासी कातकरी आणि शेतमजुरांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. या प्रकल्पांमुळे जलसंपत्ती, शेती आणि पर्यावरण धोक्यात येऊ शकते. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे जीवनमान उद्ध्वस्त होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी (Ujani Dam Project)मांडली.
दरम्यान, उजनी प्रकल्पाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. शासनाच्या वतीने गावागावांत जनसुनावणी घेण्यात येईल आणि तोपर्यंत प्रस्तावित प्रकल्पांचे काम बंद ठेवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित (Ujani Dam Project)केले.
