(पिंपरी ): रहाटणी येथे डॉक्टरांच्या दवाखान्याशेजारील औषध दुकानातून औषधे घेतलेल्या रुग्णांना दुसऱ्या मेडिकलमध्ये पाठविल्याच्या कारणावरून डॉक्टर आणि परिचारिकेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी डॉक्टरांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली (Rahatani Doctor Assault)आहे.
डॉ. संदीप लुणावत (वय ५८, रा. विशालनगर, पिंपळे गुरव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, औषध विक्रेता ओंकार सुनील पाटील आणि त्याच्यासोबत तीन महिला व अन्य दोन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला(Rahatani Doctor Assault) आहे.
डॉ. लुणावत यांच्या दवाखान्याशेजारी ओंकार यांचे औषध दुकान आहे. दवाखान्यात नसलेल्या औषधांसाठी रुग्णांना दुसऱ्या मेडिकलमध्ये पाठविले जात असल्याच्या कारणावरून आरोपींनी डॉक्टर व परिचारिकेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सोमवारी (दि. १९) दुपारी हा प्रकार (Rahatani Doctor Assault)घडला.



