(पिंपरी, ९ ऑक्टोबर) : कधी मिश्कील शब्दांतून हास्याची कारंजी, कधी प्रेमाच्या तरल भावनांचा आविष्कार, तर कधी आईच्या आठवणीने मनाला भिडणारी कविता… अशा विविध भावछटांनी प्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी यांची ‘द मनमौजी’ ही काव्यमैफल रंगली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (Vaibhav Joshi)होते.
वैभव जोशी यांनी आपल्या कविता आणि गझलांच्या माध्यमातून प्रेम, सौंदर्य, निसर्ग, मानवी स्वभावातील गमतीजमती आणि आईविषयीचे प्रेम अशा विविध विषयांना स्पर्श केला. सहजसुंदर सादरीकरण आणि मनमोकळ्या संवादामुळे मैफलीत रंगत (Vaibhav Joshi)आली.
मिश्कील शब्दांतून हास्याची कारंजी
‘एक पेग म्हणता म्हणता दोन-चार झाले, सशासारखे जिने एकदम पाणीदार झाले,’ अशा मिश्कील ओळींनी रसिकांना खळखळून हसवले. दैनंदिन जीवनातील प्रसंगांतून विनोदाची निर्मिती करत मानवी स्वभावातील गमतीशीर पैलू त्यांनी (Vaibhav Joshi)उलगडले.
सौंदर्य आणि निसर्गाची शब्दमय गुंफण
‘तिला पाहून सळसळत्या वनाची आठवण येते…’ आणि ‘तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते…’ अशा निसर्गप्रतिमांनी नटलेल्या ओळींतून प्रेमाच्या तरल भावविश्वाचे दर्शन घडले. निसर्गातील ताजेपणा, चंदनाचा सुगंध आणि प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वातून जागणाऱ्या भावना यांची सुंदर गुंफण त्यांच्या कवितांतून अनुभवायला (Vaibhav Joshi)मिळाली.
‘मन तुझे जलतरंग…’ला रसिकांची दाद
‘मन तुझे जलतरंग, लहरी तुझा साज’ या लोकप्रिय रचनेतून प्रेमभावनेचा सुरेल आविष्कार झाला. शब्दांचे नादमाधुर्य आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे या कवितेला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद (Vaibhav Joshi)दिली.
आईविषयीच्या कवितेने मनाला स्पर्श
‘आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्याविना जगण्याचा सराव नाही आई…’ या ओळींमधून आईच्या अस्तित्वाचे महत्त्व आणि तिच्या सहवासातून मिळणारे बळ व्यक्त झाले. संकटांना सामोरे जाण्याची तयारी असली, तरी आईच्या अनुपस्थितीची कल्पनाही मनाला अस्वस्थ करते, ही भावना या रचनेतून प्रभावीपणे मांडण्यात (Vaibhav Joshi)आली.
विनोदापासून भावुकतेपर्यंतचा प्रवास घडवणाऱ्या या मैफलीत कविता आणि संवाद यांची सुंदर सांगड घालण्यात आली. प्रत्येक रचनेमागील आशय आणि भावना सहजपणे रसिकांपर्यंत पोहोचल्याने ‘द मनमौजी’ हा कार्यक्रम कवी आणि रसिक यांच्यातील जिव्हाळ्याचा संवाद (Vaibhav Joshi)ठरला.
‘चांगभलं’मधून मराठी लोकसंस्कृतीचा सुरेल आविष्कार
‘चांगभलं’ या सांगीतिक कार्यक्रमातून मराठी संगीत, लोकसंस्कृती आणि परंपरेचे विविध रंग उलगडले. संगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Vaibhav Joshi)मिळाला.
‘गझल आख्यान’मधून गझलेचे भावविश्व
‘गझल आख्यान’ अर्थात ‘मुजुमदार सरांचा क्लास’ या कार्यक्रमातून गझलेची रचनापद्धती, शब्दांचे अर्थ, भावछटा आणि संगीताशी असलेले नाते उलगडण्यात आले. साहित्य आणि संगीत यांच्या संगमातून गझलविश्वाची ओळख करून देणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विशेष (Vaibhav Joshi)ठरला.
‘म… मराठीचा’ कार्यक्रमातून गीतसंगीताची मेजवानी
दिग्गज गायकांच्या सुरेल आवाजात रंगलेल्या ‘म… मराठीचा’ या सांगीतिक कार्यक्रमातून मराठी गीतसंगीताचा समृद्ध वारसा उलगडला. लोकप्रिय गीते, भावस्पर्शी सादरीकरण आणि मराठी भाषेविषयीचा अभिमान यांचा संगम या मैफलीत अनुभवायला(Vaibhav Joshi) मिळाला.
‘सूर तरुणाईचा… ध्यास मराठीचा’मधून नव्या पिढीचा आविष्कार
महिला वाद्यवृंदाचे सादरीकरण आणि मराठी चित्रपटगीतांच्या सुरेल मैफलीने ‘सूर तरुणाईचा… ध्यास मराठीचा’ या कार्यक्रमात रंगत आणली. ‘सूर नवा ध्यास नवा’ आणि ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमांमधून परिचित असलेले गायक विनल देशमुख, गायिका वर्षा एखंडे आणि ‘इंडियन आयडल मराठी’ फेम गायिका अश्विनी मिटे यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. तरुणाईची ऊर्जा आणि मराठी संगीताची गोडी यांचा सुरेल संगम या कार्यक्रमातून अनुभवायला(Vaibhav Joshi) मिळाला.




