(पिंपरी-चिंचवड ): महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यकारिणी निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. २१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आलेली बिनविरोध कार्यकारिणीची निवडणूक लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नसल्याचा आरोप काही आजीव सभासदांनी केला आहे. या प्रकरणावर लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे शाखेच्या कारभाराविषयी नव्याने चर्चा सुरू झाली (Masap Pimpri Chinchwad) आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली नसल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सभासदांनी केली आहे. निवडणुकीचे नियम आणि प्रक्रिया यांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. चौकशीअंती अनियमितता आढळल्यास जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली (Masap Pimpri Chinchwad)आहे.
सभासदांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले असून, यापूर्वीही संबंधित पदाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविण्यात आले होते. मात्र, त्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ९४ पैकी ८० टक्के आजीव सभासदांना सर्वसाधारण सभेची आणि निवडणुकीची पूर्वसूचना मिळाली नसल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही सभासदांना फोन किंवा संदेशाद्वारे बोलावून सभा घेण्यात आल्याचेही म्हटले (Masap Pimpri Chinchwad) आहे.
कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांच्या निवडीबाबतही आक्षेप घेण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज मागविणे, निवडणूक घेणे आणि त्यासंबंधीची माहिती सर्व सभासदांपर्यंत पोहोचविणे या प्रक्रियेत पारदर्शकता होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला (Masap Pimpri Chinchwad) आहे.
माध्यमवर्ती कार्यालयाच्या अधिकृत मान्यतेबाबतही संभ्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुरूषोत्तम काळे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे अधिकृत पत्र मागविण्यात आले; मात्र ते उपलब्ध झाले नसल्याचे सभासदांनी म्हटले आहे. तसेच निवडणुकीचा निर्णय कोणत्या सभेत झाला, सभासदांना त्याची पूर्वसूचना कधी व कशी देण्यात आली, नामनिर्देशन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते का आणि अर्ज भरण्यासाठी किती मुदत दिली, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले (Masap Pimpri Chinchwad)आहेत.
या प्रकरणात राजेंद्र घावटे , सुहास पोफळे, प्रकाश निर्मळ, राज आहेरराव चंद्रकांत घस, प्रा. तुकाराम पाटील, संदीप तापकीर, सविता इंगळे आणि नितीन यादव यांच्यासह काही सभासदांनी आक्षेप नोंदविल्याचे वृत्तात नमूद (Masap Pimpri Chinchwad)आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यिक आणि साहित्य संस्थांसाठी महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे तिच्या स्थानिक शाखेचा कारभार पारदर्शक, नियमबद्ध आणि लोकशाही पद्धतीने चालणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि सभासदांचा विश्वास कायम राखावा, अशी मागणी साहित्य क्षेत्रातून होत (Masap Pimpri Chinchwad)आहे.
शाखेच्या कारभाराविषयी उपस्थित झालेल्या प्रश्नांची संबंधित पदाधिकाऱ्यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असून, साहित्य संस्थांचा कारभार काही व्यक्तींच्या मर्जीने नव्हे, तर नियम आणि लोकशाही मूल्यांनुसार चालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साहित्यिकांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संस्थेच्या पारदर्शक कारभारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत (Masap Pimpri Chinchwad)आहे.
