(भोसरी) : भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने भोसरी येथे आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात पार पडली. राष्ट्रविकास, जनसेवा आणि संघटनबळ अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोसरी परिसरात भाजपाचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला (Seva Jyoti Yatra) मिळाले.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवा, सुशासन आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासह राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात(Seva Jyoti Yatra) आले.
केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवा : केशव उपाध्ये
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संघटन अधिक सक्षम करण्यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला जनसहभाग आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय योगदानाची जोड देण्याचे आवाहन त्यांनी(Seva Jyoti Yatra) केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, गटनेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटनी, वैशाली खाड्ये, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रभारी राजेश पिल्ले यांच्यासह सर्व मंडलाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Seva Jyoti Yatra)होते.
‘संकल्प विकासाचा, ज्योत सेवेची आणि ध्यास विकसित भारताचा’ या भावनेतून आयोजित ‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ही यात्रा कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी (Seva Jyoti Yatra)ठरली.
‘विकसित भारत’ प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची जबाबदारी : महेश लांडगे
“‘विकसित भारत’ ही केवळ संकल्पना न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि नागरिकाची आहे. सेवा, सुशासन आणि विकासाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे. ‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला जनसहभागाची जोड देत विकासाच्या प्रवाहात प्रत्येक घटकाला सहभागी करून घेण्याचा निर्धार करूया. संघटनेची ताकद कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे आणि हीच एकजूट राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अधिक बळ देईल,” असे आमदार महेश लांडगे यांनी (Seva Jyoti Yatra)सांगितले.



