पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ, कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक डॉ. शिरीष (एम. एस.) हिरेमठ यांचे गुरुवारी रात्री पुण्यात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली (Dr Shirish Hiremath)आहे.
डॉ. हिरेमठ यांनी १९८९ मध्ये पुण्यातील पहिली अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या केली होती. हृदयरोग उपचार क्षेत्रातील चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि एक लाखांहून अधिक अँजिओग्राफी तपासण्या केल्या. गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी उपचारांमधील त्यांचे कौशल्य विशेष प्रसिद्ध होते. देश-विदेशातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारांसाठी येत असत. त्यांच्या निधनाने भारतीय हृदयरोग उपचार क्षेत्राची मोठी हानी झाली(Dr Shirish Hiremath) आहे.

(पिंपरी-चिंचवड ,4 सप्टेंबर 2026): विद्यार्थ्यांसह युवकांमध्ये क्रीडाविषयक ज्ञान, खेळांची आवड आणि क्रीडा संस्कृती वाढावी, या उद्देशाने क्रीडा भारतीतर्फे ‘क्रीडा ज्ञान परीक्षा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही ऑनलाइन परीक्षा रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरात घेण्यात येणार (Krida Gyan Pariksha)आहे.
