(चिंचवड, दि. २१ ): वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या पंधरा दिवसीय जनजागृती अभियानाची सांगता झाली. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील ‘सायबर योद्धा’ विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसरातील विविध ठिकाणी नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे धडे (Cyber Security Campaign)दिले.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, संचालक अजय शिर्के, दिपू सिंग आणि गायत्री केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात (Cyber Security Campaign)आले.
पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य ए. के. जाधव आणि दामोदर चापेकर यांच्या उपस्थितीत जनजागृती करण्यात आली. तसेच काळभोरनगर, रूपीनगर येथील तृतीयपंथीय समुदाय, भाजी विक्रेते, नागरिक, विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील लघुउद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात (Cyber Security Campaign)आले.
मावळ परिसरातील सातेगाव येथे सरपंच ज्योती आगलमे आणि उपसरपंच वैशाली आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रतिभा महाविद्यालयाच्या सायबर सेलच्या अध्यक्षा स्नेहा तेली यांच्यासह सिमरन यादव, पियुषा रोहम, साकिब चौधरी, प्रज्ञा गावडे आणि फैसल खान या सायबर योद्ध्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत सायबर सुरक्षिततेविषयी जागृती केली. घरोघरी सर्वेक्षण करून नागरिकांच्या मोबाइलमधील सायबर सुरक्षेशी संबंधित बाबींची तपासणी करण्यात आली. तसेच समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी, सरपंच ज्योती आगलमे आदी मान्यवरांच्या हस्ते ‘सायबरमुक्त प्रमाणपत्रांचे’ वाटप करण्यात(Cyber Security Campaign) आले.
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
या अभियानाचा मुख्य उद्देश ऑनलाइन फसवणूक, आर्थिक लूट, समाजमाध्यमांचा गैरवापर आणि वैयक्तिक माहितीची चोरी यांसारख्या सायबर धोक्यांपासून नागरिकांना सावध करणे हा होता. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि विविध समुदायांमध्ये प्रत्यक्ष संवाद साधून विद्यार्थ्यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून (Cyber Security Campaign)दिले.
अनाहूत संदेश किंवा अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, बँक खात्याची माहिती, ओटीपी आणि पासवर्ड कोणालाही सांगू नयेत, अक्षरे, आकडे आणि विशेष चिन्हांचा वापर करून मजबूत पासवर्ड तयार करावा, तसेच समाजमाध्यमांवर वैयक्तिक माहिती, छायाचित्रे आणि लोकेशन अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नये, असे आवाहन करण्यात (Cyber Security Campaign)आले.
सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अशी माहितीही विद्यार्थ्यांनी (Cyber Security Campaign)दिली.
विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केवळ वर्गातील शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत डिजिटल साक्षरतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या या प्रयत्नांचे नागरिकांनी कौतुक (Cyber Security Campaign)केले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे सांगितले. अभियानात सहभागी झालेल्या सायबर योद्धा विद्यार्थ्यांचेही त्यांनी कौतुक (Cyber Security Campaign)केले.
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमातून सुरक्षित, सतर्क आणि सक्षम डिजिटल समाज घडविण्याचा संदेश देण्यात आला. सायबर सुरक्षितता ही केवळ काळाची गरज नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश पंधरा दिवसांच्या जनजागृती अभियानातून देण्यात (Cyber Security Campaign)आला.
