(पिंपरी, दि. २१ ऑक्टोबर २०२६ ): “साहित्यविश्व अद्भुत असून लेखनातून अवर्णनीय आनंद लाभतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अनिल शिंदे यांनी केले.खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे दिलासा साहित्य सेवा संघाच्या वतीने लेखक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीच्या विजयादशमीपासून संघाच्या व्हॉट्सॲप समूहावर वर्षभर साप्ताहिक सदरलेखन करणाऱ्या लेखकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अनिल शिंदे बोलत (Dilasa Writer Felicitation)होते.
ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सुलभा सत्तुरवार आणि कवयित्री फुलवती जगताप यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, बाळकृष्ण अमृतकर, कल्पना बंब, मल्लिकार्जुन इंगळे आणि प्रकाश रणदिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित (Dilasa Writer Felicitation)होते.
या सोहळ्यात अशोकमहाराज गोरे (‘वेदावतार तुकोबा’), अर्जुन चौधरी (‘आठवणींच्या वाटेवर’), नारायण कुंभार (‘गण गण गणात बोते’), सुहास सतर्के (‘जय जय श्री गुरुदेवदत्त’), सुरेश कंक (‘चला चला जाऊ सिनेमाला’), कांचन नेवे (‘प्रभात दरवळ’) आणि अंबादास रोडे (‘विद्यार्थी घडविताना…’) या साप्ताहिक सदरांचे लेखन करणाऱ्या लेखकांचा सन्मान करण्यात(Dilasa Writer Felicitation) आला.
सुलभा सत्तुरवार यांनी लेखकांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात तानाजी एकोंडे यांनी लेखकांनी आशयघन लेखनासोबतच शुद्धलेखनाचे निकष पाळावेत, असे आवाहन केले. लेखन करताना वाचकांच्या सूचना, टीका आणि टिप्पणी यांचाही आदर करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सन्मानित लेखकांच्या वतीने नारायण कुंभार, अर्जुन चौधरी आणि सुरेश कंक यांनी मनोगत व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त(Dilasa Writer Felicitation) केली.
ग्रंथपूजन आणि सुभाष चव्हाण यांच्या शंखवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शामराव सरकाळे, सुहास घुमरे, स्मिता सतर्के, श्रीकृष्ण नेवे आणि अजय नेवे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर शामला पंडित यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता(Dilasa Writer Felicitation) झाली.
