(पिंपरी-चिंचवड) : महाराष्ट्रात संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुरू असलेली बांधकामे तातडीने बंद करावीत, तसेच नवीन बांधकाम परवाने देण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापौर रवी लांडगे यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली (Pcmc Water Crisis)आहे.
शहरात सुमारे ४० टक्के पाणीगळती आणि पाणीचोरी होत असल्याचा दावा करत ती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच टँकर माफियांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. शहरातील वाहन धुलाई केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. तसेच खासगी वाहनांची धुलाई, बागांना पाणी देणे आणि कुंड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. हा गैरवापर रोखण्यासाठीही कठोर निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली (Pcmc Water Crisis)आहे.
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि महापालिका प्रशासनाची तातडीने बैठक घेऊन पाणी बचतीसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली (Pcmc Water Crisis)आहे.
