पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात कथित मद्यपार्टी आणि कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १६ ऑक्टोबर रोजी निलंबनाचे आदेश दिले असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीचेही आदेश दिले (YCM Hospital Alcohol Party)आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर प्रकरणाला वाचा फुटली. शवविच्छेदन विभागातील टेबलवर मद्याची बाटली, खाद्यपदार्थ आणि जेवणाच्या प्लेट्स दिसत असल्याचे व्हिडिओतून समोर आले. संबंधित वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला(YCM Hospital Alcohol Party) आहे.
मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला रात्रभर प्रतीक्षा करावी लागल्याचे वृत्त आहे. बराच वेळ उलटूनही दाखला मिळत नसल्याने संबंधित व्यक्तीने विभागात जाऊन चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार निदर्शनास आल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले (YCM Hospital Alcohol Party)आहे.
महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विभागीय चौकशीनंतर पुढील कारवाई केली झाली (YCM Hospital Alcohol Party)आहे.
वायसीएमसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक रुग्णालयातील या प्रकारामुळे रुग्णसेवेतील शिस्त आणि जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपांची विभागीय चौकशीत पडताळणी होणार (YCM Hospital Alcohol Party)आहे.
